ETV Bharat / city

Pune Crime : 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

जोग एज्युकेशन ट्रस्टच्या 11 शाळांसाठी ( Jog Education Trust ) शिक्षण अधिकाऱ्यांचे खोट्या सह्या करून स्व मान्यता प्रमाणपत्र तयार करून कोट्यावधी रुपयांची शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी सुप्रसिद्ध मराठी अभिनेता पुष्कर जोग ( Pushkar Jog ) यांच्या मातोश्री जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सुरेखा जोग यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Pune Crime
Pune Crime
author img

By

Published : May 25, 2022, 12:11 PM IST

पुणे - जोग एज्युकेशन ट्रस्टच्या 11 शाळांसाठी ( Jog Education Trust ) शिक्षण अधिकाऱ्यांचे खोट्या सह्या करून स्व मान्यता प्रमाणपत्र तयार करून कोट्यावधी रुपयांची शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी सुप्रसिद्ध मराठी अभिनेता पुष्कर जोग ( Pushkar Jog ) यांच्या मातोश्री जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सुरेखा जोग यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

हेमंत सावळकर यांच्यावर गुन्हा दाखल - जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किसन दत्तोबा भुजबळ ( ५३ ) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार जोग एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा सुरेखा सुहास जोग वरिष्ठ सहायक गौतम शंकर शेडगे, सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी किशन पवार आणि मनरेगा विभागाचे वरिष्ठ सहायक हेमंत सावळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२२ दरम्यान घडला आहे. याप्रकरणी शिक्षण विभागाकडे तक्रार आली होती. त्याची चौकशी केली असता, हा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट स्व मान्यता प्रमाणपत्र तयार करण्यासाठी किशोर पवार, हेमंत सावळकर यांनी एज्युकेशन ट्रस्टकडून एका स्व मान्यता प्रमाणपत्रासाठी २५ हजार रुपये याप्रमाणे 11 सर्व मान्यता प्रमाणपत्रासाठी एकूण २ लाख ७५ हजार रुपये घेतल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासणीत दिसून आले आहे.

११ शाळांची खोटी व बनावट स्वमान्यता प्रमाणपत्र - एक एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२२ या तीन वर्षांच्या कालावधी दरम्यान जोग एज्युकेशन ट्रस्टतर्फे चालवल्या जाणाऱ्या ११ शाळांची खोटी व बनावट स्वमान्यता प्रमाणपत्र तयार करून शाळांवर प्रशासक नियुक्तीची कारवाई टाळण्यासाठी जोग एज्युकेशन ट्रस्टने शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्याकडे सादर केली आहेत. तसेच या 11 शाळांच्या मुख्याध्यापकाद्वारे 25 टक्के मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांचे प्रतिशुल्क मिळवण्यासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे प्रस्ताव सादर करून शिक्षण विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजेश बेल्हेकर आणि प्राध्यापक नरेश चव्हाण यांनी शिक्षण मंत्री तसेच शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

हेही वाचा - Sugar Export Restricted : साखरेच्या निर्यातीवर केंद्र सरकारचे निर्बंध..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.