ETV Bharat / city

उद्योजक गौतम पाषाणकर यांच्याविरोधात फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Shivajinagar police station

उद्योजक गौतम पाषाणकर, रिनल पाषाणकर, दीप पुरोहित या तिघांविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादीच्या तक्रारीवरून आर्थिक फसवणूक आणि मारहाण झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

उद्योजक गौतम पाषाणकर
उद्योजक गौतम पाषाणकर
author img

By

Published : Sep 12, 2021, 2:27 PM IST

पुणे - देणेकऱ्यांनी तगादा लावल्याने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून घर सोडून निघून गेलेले उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह तिघांवर शिवाजीनगर पोलिसांनी २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दीप विजय पुरोहित (रा. कल्याणीनगर), गौतम पाषाणकर आणि रिनल पाषाणकर (रा. शिवाजीनगर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहे.

ऑफिसमध्ये बोलावून करण्यात आली मारहाण

नरेंद्र पाटील यांनी खराडी परिसरात प्रॉक्सिमा क्रिएशन बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या सी बिल्डिंगमध्ये पी 101 आणि 102 मध्ये 2 कोटी 87 लाख रूपयात खरेदी करण्याचा व्यवहार गौतम पाषाणकर, रिनल पाषाणकर आणि दीप पुरोहित यांच्या सोबत ठरला होता. त्यानुसार फिर्यादी नरेंद्र पाटील यांनी त्यापैकी वेळोवेळी अशी मिळून 2 कोटी 40 लाख रूपयांची रक्कम देखील दिली होती. मात्र त्याच दरम्यान 101 क्रमांकाची सदनिका गणेश शिंदे, तर 102 क्रमांकाची सदनिका मनीषा गोरद यांच्या नावावर कुलमुखत्यार करण्यात आले. याबाबतची माहिती फिर्यादी नरेंद्र पाटील यांना मिळताच त्यांनी तिन्ही आरोपींना विचारले. त्यावर फिर्यादी यांना जंगली महाराज रोडवरील ऑफिसमध्ये बोलवले. त्यावेळी फिर्यादी यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये फिर्यादी नरेंद्र पाटील यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याची घटना घडली आहे.

फसवणूक आणि मारहाण झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल

गौतम पाषाणकर, रिनल पाषाणकर, दीप पुरोहित या तिघांविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादीच्या तक्रारीवरून आर्थिक फसवणूक आणि मारहाण झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.