पुणे - शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्यावर माजी मंत्री विजय शिवतारे ( Vijay Shivtare ) यांनी प्रतिक्रिया दिली ( Expulsion of Vijay Shivtare from Shiv Sena ) आहे. ते म्हणाले की, मला खंत वाटली की 13 वर्ष शिवसेनेचे विचार गोरगरीबापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यात मी यशस्वी झालो. बारामती मतदार संघाला लागून असलेला हा पुरंदर हवेली मतदार संघात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मी प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी देखील झालो. जर याचा फळ हकालपट्टी म्हणून ते देत असतील तर काय म्हणणार. आता जहा शिंदे वाहा शिवतारे आणि जहा देवेंद्र वाहा शिवतारे असे यावेळी शिवतारे यांनी म्हटले आहे.
पक्षातून हकालपट्टी - शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे हे मध्यंतरी एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर पक्षाचे नेते संजय राऊत यांच्यावर जाहीर नाराजगी व्यक्त करत जोरदार टीका देखील केली होती. त्यांच्या या निर्णयाने पक्षश्रेष्ठींनी दखल घेत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. शिवसेनेचे बंड नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड केल्यानंतर शिवसेनेतील माजी आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष देखील एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. अश्यातच राज्यभर शिवसैनिक आणि शिंदेगट यांच्यामधील संघर्ष पाहायला मिळाला. पक्षश्रेष्ठींनी याची दखल घेत जे जे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली असून पुणे जिल्ह्यातील माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या देखील आता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या मुखपत्रातून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. पक्षाच्या विरोधात काम केल्याने आणि पक्षाची शिस्त मोडल्यानंतर विजय शिवतारे यांना शिवसेनेने अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे. विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार असून ते पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करत होते. विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे गटाला समर्थन दिल्यानंतर त्यांच्यावर हकालपट्टी कारवाई करण्यात आली आहे. विजय शिवतारे यांनी आपण शिंदे गटात जात असल्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता.