पुणे - पुण्यात महावितरण विभागाचा ( Pune MSEB ) अजब कारभार पाहायला मिळत आहे. महावितरण विभागाने पुणे महापालिकेच्या कमला नेहरु पार्क उद्यानाच ( Kamla Neharu Park Electric Bill ) एका महिन्याचे बील पाठवले आहे. त्या बिलाचा आकडा पाहून महापालिकेलाच आकडी आलेली पाहायला मिळत आहे. महावितरण विभागाने पुणे महापालिकेला कमला नेहरु पार्क उद्यानाच फेब्रुवारी महिन्याचे तब्बल दोन लाख 72 हजार इतकं बील दिले आहे.
चार दिवसांपासून उद्यान अंधारातच -
आता पालिकेने बील न भरल्याने महावितरणने कमला नेहरु पार्क उद्यानाची वीजच कट केली आहे. उद्यानात चार दिवसांपासून वीज नसल्याने उद्यानच अंधारात गेले आहे. मात्र, आता वीज नसल्याने पुणेकरांचे हाल झालेले पाहायला मिळत आहे.
पुणे महापालिकेचं स्पष्टीकरण -
आता या सगळ्यात प्रकरणावर महापालिकेनं आपलं स्पष्टीकरण दिले आहे. महापालिकेकडून कोणतेही थकबाकी नसल्याचा दावा करण्यात आला आहे. याऊलट कुठलीही पूर्वसूचना न देता वीज कट केल्याचे पालिकेने आरोप केला आहे. आता यावरून पुणे महापालिका आणि महावितरणमध्ये संघर्ष निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे.
हेही वाचा - China Eastern Airlines Aircraft Accident : चीनमध्ये 133 प्रवाशी घेऊन जाणारे विमान कोसळले