पुणे - जिल्ह्यातील दीपावलीच्या सुट्टीनंतर 4 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या खाजगी व शासकीय माध्यमिक शाळा, विद्यालय आणि महाविद्यालय यांना शनिवारी सकाळी तातडीची सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहे.
हेही वाचा... 'अयोध्या' प्रकरणी निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त
शनिवारी राममंदिर व बाबरी मज्जिद यासंदर्भात निकालाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना तातडीची सुट्टी देण्यात आली आहे. ज्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू आहेत त्यांना तातडीने सुट्टी देण्यात आली असून व ज्या शाळा दुपारच्या सत्रामध्ये भरणार आहेत त्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद यांच्यामार्फत देण्यात आले आहे.
हेही वाचा... जातीय व धार्मिक सलोख्याची परंपरा अबाधित ठेवूयात - पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते
खेड आंबेगाव जुन्नर शिरूर या तालुक्यातील सकाळ सत्रातील शाळा सकाळी 10 वाजता सोडून द्याव्यात व दुपार सत्रातील शाळा भरवू नयेत असे आदेश डॉ गणपत मोरे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी दिले आहे.