ETV Bharat / city

एल्गार परिषद प्रकरण : पुणे पोलीस 'एफबीआय'ची मदत घेण्याची शक्यता

एल्गार परिषद प्रकरणातील खराब झालेल्या हार्ड डिस्कमधील डेटा परत मिळवण्यासाठी पुणे पोलीस अमेरिकी यंत्रणेची मदत घेणार असल्याची माहिती समोर येते आहे.

Elgar Parishad: pune police will seek help from FBI
एल्गार परिषद प्रकरण: पुणे पोलीस एफबीआयची मदत घेण्याची शक्यता
author img

By

Published : Dec 26, 2019, 6:30 PM IST

Updated : Dec 26, 2019, 7:04 PM IST

पुणे - एल्गार परिषद प्रकरणातील खराब झालेल्या हार्ड डिस्कमधील डेटा परत मिळवण्यासाठी पुणे पोलीस अमेरिकी यंत्रणेची मदत घेणार असल्याची माहिती समोर येते आहे. 2017 मध्ये 31 डिसेंबरला शहरातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. पुढील दिवशी भीमा-कोरेगाव येथे विजयस्तंभ अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी मोठी दंगल झाली होती.

हेही वाचा : 'एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांच्या कारवाईची एसआयटी चौकशी करावी'

संबंधित प्रकारानंतर पोलिसांनी अटकसत्र सुरू केले. यामध्ये परिषदेतील वक्त्यांनी केलेल्या भाषणांचा आधार घेण्यात आला. सध्या नक्षली चळवळीशी संबंधित आठ जण अटकेत आहेत. यामधील आरोपी वरवरा राव यांच्या घरातून शहर पोलिसांनी एक हार्डडिस्क जप्त केली होती. ती ओपन होत नसल्यामुळे पुणे पोलिसांनी चार वेगवेगळ्या फॉरेन्सिक लॅबची मदत घेतली. परंतु, अद्याप त्यांना यामध्ये यश न आल्याने आता पोलीस अमेरिकेच्या एफबीआय या एजन्सीची मदत घेणार असल्याचे समोर आले आहे.

यासाठी पुणे पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचे एक पथक लवकरच अमेरिकेला रवाना होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Intro:एल्गार प्रकरणात पुणे पोलीस, एफबीआय ची मदत घेण्याची शक्यताBody:mh_pun_03_fbi_help_pune_police_av_7201348

anchor
एल्गार परिषद प्रकरणातील डॅमेज झालेल्या हार्डडिस्कमधील डेटा परत मिळवण्यासाठी पुणे पोलीस अमेरीकेच्या एफबीआयची मदत घेणार असल्याची माहिती समोर येते आहे, 31 डिसेंम्बर 2017 ला पुण्यातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषद झाली होती आणि 1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभ अभिवादन करण्यासाठी
लाखोंचा समुदाय आलेला असताना मोठी दंगल झाली होती...या घटनेनंतर
एल्गार परिषदेसाठी आलेल्या वक्त्यांनी केलेल्या भाषणांचा आधार घेत पुणे पोलिसांनी कारवाई केली होती...यात नक्षली चळवळीशी संबंधित आठ जण अटकेत आहेत यातले आरोपी वरवरा राव याच्या घरातून पुणे पोलिसांनी एक हार्डडिस्क जप्त केली होती. ही हार्डडिस्क ओपन होत नसल्यामुळे पुणे पोलिसांनी यापूर्वी चार वेगवेगळ्या फॉरेन्सिक लॅबची मदत घेतली होती..परंतु यातील माहिती मिळवण्यात त्यांना अपयश आले..त्यामुळे आता ही माहिती मिळवण्यासाठी अमेरीकेच्या एफबीआयची मदत घेण्याचे पोलिसांनी ठरवले आहे. पुणे पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचं एक पथक मिळून लवकरच अमेरिकेला ही हार्डडिस्क घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.…दरम्यान काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी एल्गार परिषदेतील भाषणांचा आधार घेत पोलिसांनी केलेल्या कारवाई बाबत साशंकता व्यक्त करत या प्रकरणात एसआयटी ची मागणी केली होती .....Conclusion:
Last Updated : Dec 26, 2019, 7:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.