ETV Bharat / city

मंदीतून बाहेर पडण्यासाठी अर्थ तज्ञांच्या गोलमेज परिषदेचे आयोजन करा, मुणगेकरांचा सरकारला सल्ला

सरकारने अहंकार सोडून आर्थिक मुद्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत अर्थतज्ञ भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.

अर्थतज्ञ भालचंद्र मुणगेकर
author img

By

Published : Sep 19, 2019, 9:01 PM IST

Updated : Sep 19, 2019, 9:55 PM IST

पुणे - देश आर्थिक गर्तेत सापडलेला आहे. मात्र, सरकारला त्याचे गांभीर्य नाही. सरकारने आपला अहंकार सोडावा आणि या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी निष्पक्ष अर्थ तज्ञांच्या गोलमेज परिषदेचे आयोजन करावे, असे मत नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी पुण्यातील एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला.

देशातील आर्थिक मंदीविषयी भाष्य करताना अर्थतज्ञ भालचंद्र मुणगेकर

देशांमध्ये असलेली मंदी ही दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत जात असून उद्योग क्षेत्रापासून विविध क्षेत्रांमध्ये मंदीची मोठी लाट आहे. सरकारला मात्र याचे गांभीर्य नाही. आर्थिक परिस्थिती बिकट असताना सरकार आणि या सरकारमधील मंत्री बेजबाबदार विधान करत आहेत. या सरकारने अहंकार सोडून आर्थिक मुद्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.

देशातील आर्थिक मंदीविषयी भाष्य करताना अर्थतज्ञ भालचंद्र मुणगेकर

हेही वाचा - भाजप सरकारच्या धोरणाने देशाची अर्थव्यवस्था डबघाईला - बाळासाहेब थोरात

सरकारवर जोरदार टीका

डॉ. मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती आणि सध्याची आर्थिक मंदी यात मोठा फरक असल्याचे त्यांनी सांगितले. हे सरकार मूळ मुद्द्यांना हात न घालता अर्थकारणाशी काहीही संबंध नसलेल्या विषयांना मोठे करुन जनतेचे लक्ष विचलित करत आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

Intro:देश आर्थिक गर्तेत सापडलेला आहे मात्र सरकारला त्याचे गांभीर्य नाही, सरकारने आपला अहंकार सोडावा आणि या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी निष्पक्ष अर्थ तज्ञांच्या गोलमेज परिषदेचे आयोजन करावे, नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ भालचंद्र मुणगेकर

Body:mh_pun_01_bhalchndra_mungekar_tictak_121_7201348

anchor
देशांमध्ये असलेली मंदी ही दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत जात असून उद्योग क्षेत्रापासून विविध क्षेत्रांमध्ये मंदीची मोठी लाट आहे सरकारला मात्र याचे गांभीर्य नाही आर्थिक परिस्थिती बिकट असताना सरकार आणि या सरकारमधील मंत्री बेजबाबदार विधान करत आहेत या सरकारने अहंकार सोडून आर्थिक मुद्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे मत नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले आहे मुणगेकर गुरुवारी पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करत सरकारवर जोरदार टीका केली डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती आणि सध्याची आर्थिक मंदी यात मोठा फरक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं हे सरकार मूळ मुद्द्यांना हात न घालता अर्थकारणाशी काहीही संबंध नसलेल्या विषयांना मोठे करून जनतेचे लक्ष विचलित करत असल्याचा आरोप देखील मुंगेकर यांनी केला आहे सध्याची निर्माण झालेली आर्थिक मंदी सरकार चा यासंदर्भातला नाकर्तेपणा या मंदीतून बाहेर येण्यासाठी काय करता येईल याबाबत मुणगेकर यांनी ईटीव्ही भारताची संवाद साधला ईटीव्ही भारताचे पुण्याचे प्रतिनिधी राहुल बागवे यांनी डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्याशी केलेली ही बातचीत
121 डॉ भालचंद्र मुणगेकर, माजी सदस्य, नियोजन आयोग

Conclusion:
Last Updated : Sep 19, 2019, 9:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.