पुणे - सध्या मोठ्या प्रमाणात देशासह राज्यात उन्हाचा पारा वाढला आहे. अशातच गेल्या 2 वर्षांपासून मुस्लिम धर्मियांचे पवित्र रमजान महिना हा उन्हाळ्यात येत असल्याने दिवसभर उपवास ठेवल्यानंतर संध्याकाळी उपवास सोडताना किंवा सोडल्यानंतर काहीतरी थंड पेय पोटात जावे, यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. अशा उन्हाळ्यात आणि तेही रमजानमध्ये पुण्यात चर्चा सुरू आहे ती म्हणजे तहूराची. तहूरा म्हणजे नेमके काय? याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...
अशी आहे तहूरा बनविण्याची प्रक्रिया : पुण्यातील गुरुवार पेठ येथील मोमीनपुरा येथे 1992 साली निसार शेख यांनी एक हातगाडीवर थंड पेय सुरू केले. त्याचे नाव ठेवले तहूरा. तेव्हापासून ते आजपर्यंत या तहूराचे टेस्ट आहे तशीच आहे. हा तहूरा बनविताना यात सुरुवातीला बर्फ टाकले जाते. त्यात रबडी बनवून टाकली जाते. मग काजू, बदाम, पिस्ता, याचे पेस्ट टाकले जात. हेच पेस्ट या तहूराचे मुख्य आकर्षण आहे. त्यानंतर सिरफ म्हणजेच पूर्णपणे दुधाचा टाकले जात. अशा पद्धतीने हे सर्व पदार्थ मिळून तहूरा बनविला जातो.
मोठ्या प्रमाणात होत आहे गर्दी : 1992 सालीपासून ते आत्तापर्यंत एकच चव असलेले निसार हे ताहूरा बनवत आहे. आजही त्याच हातगाडीत निसार हे तहूरा बनवत आहे. सध्या हिवाळा सुरू असून मोठ्या प्रमाणत उष्णता आहे. त्यात रमजान सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात तहूराला मागणी आहे. शहरातील विविध भागातील नागरिक हे मोमीनपुरा येथे येऊन खास तहूरा पितात. दिवसाला 2500 ते 3000 ग्राहक हे तहूरा पित असतात. विशेष म्हणजे तहूरा पिण्यासाठी सर्वधर्मीय नागरिक हे मोठ्या प्रमाणात येत असतात.
हेही वाचा - Use of horses for farming : बैलचं नाही मिळाले! मग काय?, घोडेचं जुंपले औताला