ETV Bharat / city

पुण्यातील हडपसर भागात डंपर आणि दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू

author img

By

Published : Feb 27, 2020, 4:22 PM IST

पुणे शहरातील हडपसर-सासवड रस्त्यावर दुचाकी आणि डंपरचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

Dumper and two-wheeler accident in hadapsar  area of Pune
पुण्यातील हडपसर भागात डंपर आणि दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे : हडपसर-सासवड रस्त्यावर दुचाकी आणि डंपरचा अपघात झाला. दुचाकीस्वार डंपर खाली आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीस्वार आणि डंपर दोघेही हडपसरवरून सासवडच्या दिशेने जात असताना भेकराईनगर येथे हा अपघात झाला.

हेही वाचा - कात्रज चौकात चालकाविना धावली पीएमपी, सुदैवाने जीवितहानी नाही

सासवड रस्त्यावर मंतरवाडी फाटा ते तुकाई दर्शन या तीन किलोमीटरच्या रस्त्यादरम्यान गेल्या दोन महिन्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. हा रस्ता मृत्युचा सापळा बनलेला आहे. या रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी, रस्त्याची खराब अवस्था यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहन चालकांना जीवमुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकर समोर आले आहे. त्यातून अपघाताची भीषणता समोर येते आहे.

हेही वाचा - भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याला जीवदान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.