पुणे - शिक्षक पात्रता परीक्षा ( TET EXam Scam ) पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेल्या राज्य परीक्षा परिषदेचे निलंबित आयुक्त तुकाराम सुपे ( Suspended Commissioner Tukaram Supe ) यांचे वाहन चालक सुनील घोलप ( Driver Sunil Gholap ) यांना देखील अटक करण्यात आली आहे. या पेपरफुटीत त्याचा सहभाग असल्याने त्याला आणि या गुन्ह्यातील एजंट मनोज डोंगरे याला पुणे पोलिसांनी ( Pune Police ) अटक केली आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणात सुपे यांच्या वाहन चालकाने प्रश्नपत्रिका एजंटपर्यंत पुरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे तपासात पुढे आले आहे.
- अजून दोन जणांना अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात गैरप्रकार केल्याचे निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यात परीक्षा परीषदेचे आयुक्त तुकाराम सुपे व शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरकर यांना अटक केली आहे. पोलिसांनी विचारपूस करताना तुकाराम सुपे यांचा वाहन चालक सुनिल घोलप, ( वय ४८ वर्षे, रा. रूम नं. ५ नं. ५ गांधी कॉलनी, जय महाराष्ट्र चौक, पुणे ) याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सायबर पोलिसांच्या तपास पथकाकडून शोध घेवून त्याला पोलीस ठाण्यात आणून या गुन्ह्यासंबंधी चौकशी केली. त्याचा यात सहभाग असल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. याव्यतिरीक्त या गुन्ह्यातील एजंट मनोज शिवाजी डोगरे, ( वय ४५ कोरा. रत्नेश्वर सोसायटी, मोतीनगर, लातूर) याचाही यात सहभाग असल्याचे तपासात उघड झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे.
- आत्तापर्यंत 28 हुन अधिक आरोपींना अटक
या प्रकरणात आत्तापर्यंत 28 हुन अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, अभिषेक सावरकर तसेच जी ए टेक्निकल सॉफ्टवेअरचे संचालक प्रितेश देशमुखसह 28 जणांना अटक करण्यात आली आहे. शिवाय पोलिसांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे. ज्या विद्यार्थ्यांची अशा पद्धतीने फसवणूक करण्यात आलेली आहे. त्या विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा.
हेही वाचा - TET Exam Scam update : तुकाराम सुपे यांच्याकडून पुन्हा पुण्यातून 10 लाख जप्त.. एकूण 2 कोटी 58 लाख रुपये जप्त