पुणे - चांद्रयान मोहीम पूर्ण होऊ शकली नसली, तरीही त्यातून शास्त्रज्ञांना मिळालेला अनुभव फार मोठा आहे, असे मत डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे (DRDO) महासंचालक प्रवीण मेहता यांनी व्यक्त केले आहे. मेहता यांनी शनिवारी पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. त्यावेळी ते बोलत होते.
चांद्रयान २ चा चंद्राच्या भूपृष्ठापासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना संपर्क तुटला. मात्र, हा पल्ला गाठणे हे खूप मोठे यश आहे, असे ते म्हणाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हेलियमचा साठा सापडण्याची शक्यता होती; त्यात यश आले असते तर पृथ्वीवर ऊर्जेसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरले असते, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा India's Lunar Mission: 'चांद्रयान' मोहिमेचा थक्क करणारा प्रवास, 2003 ते 2019
येणाऱ्या काळात आपले शास्त्रज्ञ या मोहिमेचे विश्लेषण करून लवकरच मोहीम पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.