ETV Bharat / city

दीपिका झाली स्लिम; पुण्यात श्वानाचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी पहिलीच शस्त्रक्रिया - डॉ नरेंद्र परदेशीयांच्या बद्दल बातमी

श्वानाचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी देशातील पहिलीच शस्त्रक्रिया केल्याचा दावा डॉ. नरेंद्र परदेशींनी केला आहे. त्यांनी अका श्वानावर बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया करून 5 किलो वजन कमी केले आहे.

Dr. Narendra Pardesincha has claimed that this is first surgery in country to reduce the obesity of dogs
श्वानाचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी देशातील पहिलीच शस्रक्रिया, डॉ नरेंद्र परदेशींचा दावा
author img

By

Published : Jun 17, 2021, 9:15 PM IST

Updated : Jun 18, 2021, 1:43 PM IST

पुणे - श्वानावरही आता लठ्ठपणा कमी करण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, हे वाचून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, पुण्यात एका श्वानावर अशा प्रकारची बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया करून चक्क 5 किलो वजन घटवण्यात आले आहे. त्यामुळे दीपिका आता स्लिम दिसत आहे.

श्वानाचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी देशातील पहिलीच शस्रक्रिया, डॉ नरेंद्र परदेशींचा दावा

'श्वानावर लठ्ठपणाची शस्त्रक्रिया' -

श्वान प्रेमी आपल्या श्वानाला कुटूंबातील सदस्या प्रमाणेच वागवत असतात, श्वानाच्या आरोग्याची डोळ्यात तेल घालून काळजी करतात आणि महागडे उपचार देखील केले जातात. असेच एक उदाहरण पुण्यात समोर आले आहे. पुण्यातील कर्वेनगर येथे राहणाऱ्या यास्मिन दारुवाला यांच्या दीपिका या श्वानाला नीट श्वास घेता येत नव्हता, लठ्ठपणामुळे ही दीपिका एकाच जागी बसून राहायची. तिच्यावर औषधोपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नव्हती, मग दारुवाला कुटुंबाने पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. नरेंद्र परदेशी यांची भेट घेतली.

Dr. Narendra Pardesincha has claimed that this is first surgery in country to reduce the obesity of dogs
श्वानाचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी देशातील पहिलीच शस्रक्रिया, डॉ नरेंद्र परदेशींचा दावा

'वजन कमी करण्यासाठी' -

डॉ परदेशी यांनी त्यांना दीपिकाचे वजन कमी करण्याचा सल्ला दिला. यासाठी bariatric सर्जरी करण्यास सांगितले आणि तशी शस्त्रक्रिया करून दीपिकाच्या शरीरातील चरबी कमी करून 5 किलो वजन कमी करण्यात आले, आता तिचे वजन 45 किलो झाले आहे.

'आहारातील बदलाचा परिणाम'-

मानवाप्रमाणे प्राण्यांच्या आहाराच्या सवयी बदलल्या की वजन वाढते कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ जास्त दिल्याचा हा परिणाम आहे. यामुळे श्वानालाही लठ्ठपणा उच्च रक्तदाब, हृदयरोग असे विकार होऊ शकतात, असे डॉ. नरेंद्र परदेशी सांगतात.

'लठ्ठपणा आयुर्मान घटवतो' -

श्वानाचे सरासरी आयुर्मान 12 ते 15 वर्षे असते. मात्र, लठ्ठपणामुळे ते 6 वर्षांनी घटू शकते. त्यामुळे श्वानवर देखील लठ्ठ पणा कमी करण्याचे उपाय केले जातात हे या निमित्ताने समोर आले आहे. देशातील ही अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.

Last Updated : Jun 18, 2021, 1:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.