पुणे: देशात कोरोनाचे प्रमाण कमी झाले corona variant असले तरी चिंता वाढविणारी बातमी आहे. आरोग्य विभागाने राज्यात नोंदवलेले BA.2.3.20 आणि BQ.1 सारख्या नवीन व्हेरिंयटमुळे कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात, असा इशारा दिला आहे. विशेषत: हिवाळा आणि सणासुदीच्या काळात काळजी घेण्याचे आरोग्य विभागाने आवाहन केले Health Department आहे. यावर इंडीयन मेडीकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की कोरोना विषाणूचे वेगवेगळे व्हेरिएंट नव्याने सापडणे हे आत्ता नवीन नाही. आत्तापर्यंत कोरोनाचे आणि ओमायक्राँनचे व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात सापडत होते. आत्ता BA.2.3.20 आणि BQ.1 सारख्या नवीन व्हेरिएंटमुळे कोरोनाचे रुग्ण संख्या जरी वाढत असली, तरी चिंता करण्याचे कारण नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी डॉ अविनाश भोंडवे यांनी केलं आहे.
लोकांना जास्त काळजी घेण्याची गरज ते पुढे म्हणाले की BA.2.3.20 आणि BQ.1 सारख्या नवीन व्हेरिंयटमुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. भारतात हे विषाणू पहिल्यांदाच सापडलेले आहे. या व्हेरिएंटमध्ये सर्दी, खोकल्याचे जे लक्षणे असतात. अश्याच स्वरूपातील लक्षणे यात असतात. आणि 4 ते 5 दिवसात यातील रुग्ण हे बरे देखील होतात. त्यामुळे यात विशेष घाबरून जाण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तींना आधीचे आजार आहे. अश्या लोकांना जास्त काळजी घेण्याची गरज आहे. तसेच ज्यांनी लस घेतील आहे. त्यांना यामुळे मोठे आजार होण्याची शक्यता कमी आहे. तसेच पाऊस लांबल्याने जे सर्दी खोकल्याच्या आजारामध्ये वाढ झाली आहे. त्यात नागरिकांनी लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे देखील यावेळी डॉ अविनाश भोंडवे म्हणाले आहेत.
सावधगिरी बाळगणे आवश्यक आरोग्य विभागाने लोकांना फ्लू सारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि सार्वजनिक ठिकाणी कोविड-19 योग्य वर्तन पाळण्यास सांगितले आहे. तसेच लोकांना लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे. कॉमोरबिडीटीस असलेल्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी भेट देताना अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. इन्फ्लूएंझा सारखा आजार असलेल्या व्यक्तींनी शक्य तितके सार्वजनिक संपर्क टाळावे, असे आरोग्य विभागाने यावेळी सांगितले आहे.