ETV Bharat / city

Eknath Shinde : निवडून येण्यासाठी मला निवडणूक चिन्हाची गरज नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर बाण - एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर टीका

मला निवडून यायला कुठलीही निशाणी लागत नाही, एवढे काम मी माझ्या मतदारसंघात केले आहे, असा टोला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. बाळासाहेबा ठाकरेंचा खरा शिवसैनिक मातोश्रीपासून दूर जात असेल तर सत्तेचा काय उपयोग, असा सवालही शिंदे यांनी यावेळी विचारला आहे. ते आज पुण्यात बोलत होते.

Etv Bharat
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Aug 2, 2022, 9:22 PM IST

पुणे : भेटायला माझ्याकडेच वेळ होता. मात्र मला वाटत नाही बाकी कुणाकडे भेटायला वेळ होता, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला आहे. ते पुण्यात बोलत होते. शिवसेनेतील बंडखोरांच्या मतदारसंघात सध्या एकनाथ शिंदेंचे दौरे सुरू आहेत. आमच्याकडे मंत्री पद असताना आम्ही सत्तेतून बाहेर पडलो. मला निवडून यायला कुठलीही निशाणी लागत नाही, एवढे काम मी माझ्या मतदारसंघात केले आहे, असा टोला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

  • Govt came to power & our party chief became CM. We all got down to work. Meanwhile people used to come and visit me because some people (Uddhav Thackeray) had no time to meet them. Our people suffered, what was happening in the Govt was intolerable: Maharashtra CM Eknath Shinde pic.twitter.com/pOetZtJ23J

    — ANI (@ANI) August 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका - शिवसैनिकांना या अडीच वर्षात काय मिळाले, तडीपारीची कारवाई करण्यात आली. अडीच वर्षात आम्हाला कुणी विचारले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीशी फारकत करण्याची सामान्य शिवसैनिकांची भावना होती. मात्र, आम्हाल उघड्या डोळ्यांनी हे पाहत बसावे लागत होते, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

निवडून येण्यासाठी मला चिन्हाची गरज नाही - महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले आणि आमचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाले. दरम्यान, उद्धव ठाकरेंकडे लोकांना भेटायला वेळ नव्हता. त्यामुळे लोक मला भेटायला यायचे. आमच्या लोकांना त्रास सहन करावा लागला, सरकारमध्ये जे काही चालले ते असह्य होते. मी मंत्री होतो आणि उदय सामंतही. पण आम्ही सत्ता सोडली. मी माझ्या मतदारसंघात खूप काम केले आहे. लोकांकडून निवडून येण्यासाठी मला निवडणूक चिन्हाची गरज नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात म्हणाले.

हेही वाचा - Complaint Filed Against CM : औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री शिंदेंविरोधात पोलिसांत तक्रार; 'हे' आहे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.