ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 अशी आहे सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाची आख्यायिका - Shree Siddhivinayak Mandir Siddhatek

सिद्धटेकचा सिद्धीविनायक Siddhivinayak of Siddhatek हा अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे. हा एकमेव गणपती आहे, जो उजव्या सोंडेचा Ganesha of the right trunk आहे. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक असून श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा, अशी या सिद्धिविनायक गणपतीची ओळख Identity of Siddhivinayak Ganapati आहे.Shree Siddhivinayak Mandir Siddhatek

Siddhivinayak of Siddhatek
सिद्धटेकचा सिद्धीविनायक
author img

By

Published : Aug 30, 2022, 3:36 PM IST

पुणे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात येणाऱ्या सिद्धटेकचा सिद्धीविनायक Siddhivinayak of Siddhatek हा अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे. हा एकमेव गणपती आहे, जो उजव्या सोंडेचा आहे. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक असून श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा, अशी या सिद्धिविनायक गणपतीची ओळख Identity of Siddhivinayak Ganapati आहे. सिद्धटेक येथील सिद्धिविनायकाच्या मंदिरात Shree Siddhivinayak Mandir Siddhatek जेथे मूर्ती आहे, ते मंदिर कोणी बांधले याचा इतिहास उपलब्ध नाही. पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला होता. या मंदिरातील देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. तसेच फरस आणि वेस सरसेनापती हरिपंत फडके यांनी बांधलेली आहे.

ही आहेत मंदिराची वैशिष्टे या मंदिराच्या जवळून भीमा नदी Bhima river वाहते. मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य, गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे १ किलोमीटर चालावे लागते.

काय आहे आख्यायिका पूर्ण पृथ्वीवर मधु व कैटभ या असुरांचे युद्ध माजलेले होते. त्यावेळी भगवान विष्णू यांनी या टेकडीवर बसून अनुष्ठान केले. त्यामुळे या गावाचे नाव सिद्धटेक पडले, अशी आख्यायिका आहे. या ठिकाणी भगवान विष्णूला सिद्धी प्राप्त झाली आणि गणपती प्रकट झाले म्हणून गणपतीचे नाव सिद्धिविनायक आहे. या युद्धात गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला, अशीदेखील आख्यायिका आहे.

हेही वाचा Ganeshotsav 2022 अष्टविनायकांपैकी पहिला मान असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर मंदिराची ही आहेत वैशिष्टे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.