ETV Bharat / city

मोडी भाषेत सलग पाचव्या वर्षी दिवाळी अंक; पुण्यातील अभ्यासकाचा स्तुत्य उपक्रम - Modi lipi reasercher in Pune

महाराष्ट्राच्या इतिहासातील मोलाचा असा जतन केलेला शब्दठेवा हा आजही मोडी लिपीत आढळतो. एके काळी दैनंदिन व्यवहाराची लिपी केवळ अभ्यासापुरती मर्यादित राहिली आहे. अशा मोडी लिपीत गेल्या 5 वर्षांपासून वसुंधरा भाषा, मोडीलिपी संवर्धन आणि संशोधन केंद्रातर्फे दिवाळी अंक प्रकाशित होत आहे.

मोडी लिपी
मोडी लिपी
author img

By

Published : Nov 13, 2020, 5:38 PM IST

Updated : Nov 13, 2020, 6:10 PM IST

पुणे - मोडी लिपीची आवड असलेल्यांसाठी यंदाच्या दिवाळीत आनंदाची बातमी आहे. मोडी लिपीसाठी वाहून घेतलेल्या महेश जोशी यांचे मोडी लिपीतील दिवाळी अंक आपल्या भेटीसाठी येत आहेत. मोडी लिपी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावी म्हणून मोडीचे अभ्यासक महेश जोशी हे गेल्या चार वर्षांपासून मोडी लिपीत दिवाळी अंक प्रसिद्ध करत आहेत.

महाराष्ट्राच्या इतिहासातील मोलाचा असा जतन केलेला शब्दठेवा हा आजही मोडी लिपीत आढळतो. एके काळी दैनंदिन व्यवहाराची लिपी केवळ अभ्यासापुरती मर्यादित राहिली आहे. अशा मोडी लिपीत गेल्या 5 वर्षांपासून वसुंधरा भाषा, मोडीलिपी संवर्धन आणि संशोधन केंद्रातर्फे दिवाळी अंक प्रकाशित होत आहे. सुरुवातीला 5 पानांनी सुरू झालेला हा अंक आज 20 पानापर्यंत पोहोचला आहे. मोडी लिपीचा प्रसार आणि भाषेची गोडी लोकांपर्यंत निर्माण व्हावी या उद्देशाने हे पाऊल उचलले आहे. याबाबत माहिती देताना मोडीचे अभ्यासक तथा अंकाचे संपादक महेश जोशी म्हणाले, की मोडीतील अंक दर महिन्याला काढण्यात येतो. मात्र दिवाळी अंक मोडीत काढल्याने ही महत्त्वाची लिपी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकते, अशी खात्री वाटते.

हा आहे दिवाळी अंकातील विषय-

महाराष्ट्राचा इतिहास हाच या दिवाळी अंकाचा मुख्य गाभा आहे. या दिवाळी अंकातील विषयही त्यानुसार निवडण्यात आले आहेत. हा अंक म्हणजे खरे तर एक छोटी पुस्तिका आहे. त्यात राज्यातील विविध भागांतील मोडी अभ्यासक, मोडी शिक्षक, मोडीचे विद्यार्थी यांनी लेखन केले आहे. अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे यात छापलेले लेख हे मुद्रित नाहीत. प्रत्येक लेखकाचे मोडीतील हस्तलिखित यात जसेच्या तसे छापण्यात आले आहे. शिवाय लिपीचे महत्त्व विषद करणारे लेखही यात वाचायला मिळणार आहेत.

मोडी लिपी
मोडी लिपी

महाराष्ट्रातील गड-किल्ले, दिवाळीतील महत्त्वाचे दिवस आणि सणांची माहिती यात वाचकांना वाचायला मिळणार आहेत. यंदाच्या दिवाळी अंकात राज्यातील मुंबई, नाशिक, औरंगाबाद, सांगली, अमरावती, लातूर, श्रीगोंदा, ठाणे, बदलापूर व पुणे या ठिकाणांहून लेखक व विद्यार्थी यांनी लेख पाठविले आहेत.

हाताने लिहिलेले पाने पुस्तकात
हाताने लिहिलेले पाने पुस्तकात

गेल्या 26 वर्षांपासून मोडीचा अभ्यास-

महेश जोशी हे मोडी लिपीच्या प्रसार व प्रचारासाठी विविध महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांचे लेक्चर तसेच क्लासेस घेतात. त्यांनी 32 हून अधिक महाविद्यालयात जाऊन 5 हजारांहून विद्यार्थ्यांना मोडी लिपीचे प्रशिक्षण दिले आहे. ते गेल्या 26 वर्षांपासून मोडीचा अभ्यास करत आहेत.

Last Updated : Nov 13, 2020, 6:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.