पुणे - भारतीय फराळाला विदेशात शिक्षण, व्यवसाय, नोकरीनिमित्त परदेशात राहणारे किंवा स्थायिक झालेली दिवाळीला मागवीत असतात. गेल्या वर्षी कोरोनामुळे फराळाची मागणी घटली होती. मात्र, यंदा घरगुती महिला उद्योजकांची यंदाची दिवाळी गोड झाली आहे. या दिवाळीत सुमारे सत्तर हजार महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. केवळ शहरातच नव्हे, तर परदेशातही या महिलांनी तब्बल साडेतीन टन फराळ पाठविला आहे.
यंदा घरगुती महिला उद्योजकांची यंदाची दिवाळी गोड फराळाच्या खरेदीत जवळपास 15 ते 20 टक्क्यांनी वाढ -फरळाशिवाय दिवाळी पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे दरवर्षी भारतातून मोठ्या प्रमाणात परदेशात फराळ पाठवला जातो. त्यामुळे दिवाळीच्या काही दिवस अगोदरच घरात फराळ बनवण्याची लगबग सुरू होते. मात्र, हल्लीच्या काळात फराळ घरात बनवणे विरळ होत चालले आहे. नोकरी, व्यवसायातून वेळ मिळत नसल्याने बाजारातील रेडीमेड फराळ खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यात घरगुती महिलांकडून उत्पादित पदार्थांना सर्वाधिक मागणी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फराळाच्या खरेदीत जवळपास 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मोतीचूर लाडू, हातवळणीच्या चकल्या, करंज्या, अनारसे, पोह्यांचा चिवडा या पदार्थाबरोबरच गिफ्ट म्हणून देण्यासाठी ड्रायफ्रूट्सच्या बॉक्सलाही चांगली मागणी असल्याचे महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी सांगितले.
महागाईमुळे फराळ महागला - दिवाळीच्या रेडीमेड फराळाला मागणी वाढली असली, तरी कच्चा मालाच्या वाढलेल्या किमती, तेलाचे वाढलेले भाव, मजुरी आणि मटेरियल पॅकिंगचा वाढता खर्च यामुळे यावर्षी दिवाळी फराळाच्या किमतीमध्ये 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
प्रति किलो फराळांचे दर -
मोतीचूर लाडू (साधा) 400, मोतीचूर लाडू (साजूक तूपातील) 520 , बेसन लाडू 450 , पोहे चिवडा 350 , चकली 450 , शंकरपाळे 300 , अनारसे 650 असा दर आहे.