पुणे - पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनकडून आज ( 11 ऑगस्ट ) बुधवार पेठेतील देवदासी महिलांकडून रक्षाबंधन करण्यात आलं. यावेळी सर्व देवदासी महिलांनी पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरा केला. यावेळी फरासखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील माने, माजी उपमहापौर दीपक मानकर हे उपस्थित ( devedasi woman celebrate Raksha Bandhan 2022 ) होते.
रक्षाबंधनला ज्याप्रमाणे प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला संरक्षण देण्याची खात्री देतो, त्याचप्रमाणे देशभरातून वेगवेगळ्या भागातून आलेल्या या महिलांच्या समस्या पुण्यात फक्त पोलीसांसमोरच मांडू शकतात. त्यामुळे पोलीसच आमचे भाऊ आहेत आणि आम्हाला भावा सारखंच ते वागवतात, असे या महिलांना यावेळी सांगितले.
पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे म्हणाले की, या महिलांना सुरक्षित वाटलं पाहिजे. पोलिसांपासून आणि नागरिकांपासून कुठलाही त्रास न होता त्यांनी त्यांचा स्वाभिमान जपून जीवन जगले पाहिजे. यासाठीच या स्नेहभावातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आज आम्हाला या महिलांनी राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केलं, असेही पोलीस निरीक्षक लांडगे यांनी सांगितलं.
हेही वाचा - Nana Patole महाविकास आघाडी फुटीचे नाना पटोलेंचे संकेत म्हणाले आम्हाला विचारलं जात नसेल तर