पुणे : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( After the revolt of Eknath Shinde ) यांच्याबरोबर आता पुण्यातील शिवसैनिकदेखील सहभागी झाले ( Pune Shiv Sainiks are Join Shinde Group ) असून, काल हडपसर येथील कार्यक्रमात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर युवासेनेचेदेखील पदाधिकारी उपस्थित होते. यावर शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे ( Deputy Speaker of Legislative Assembly Neelam Gorhe ) यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, वाट चुकून काही लोक अशा पद्धतीने जात असतात. वारीतदेखील काही लोक रस्ता हरवतात आणि नंतर मूळ मार्गावर येतात. ( Vertical split in Shiv Sena )
पुण्यातील पदाधिकारी आपली भूमिका स्पष्ट करा : पुण्यातील जे पदाधिकारी गेले आहेत ते काय हेतूने गेले आहे. हे ते स्पष्ट करतील. जे गेलेले असतात त्यांचा शोक करायचा नसतो. आम्ही पुढे निघालो आहोत. शिवसेना एक वेगवान प्रवाह आहे. त्यामुळे आमचा रस्ता योग्य आहे. काहीजण दुसऱ्या रस्त्यावर गेले. हो आम्ही शिवसैनिक लव्हाळीसारखे आहोत, त्यामुळे संघटनेत आहोत. ज्यांना वटवृक्ष होण्याचा गर्व झाला ते पडले, असे मत यावेळी गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
निवडुंग्या विठोबा मंदिरात घेतले दर्शन : पुण्यातील सुप्रसिद्ध निवडुंग्या विठोबा मंदिरात आज त्यांनी स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या समवेत दर्शन घेतले. त्यावेळी त्या बोलत होत्या. श्रीविठ्ठलाच्या कृपेने सर्व जनता सुखी राहो, रुक्मिणी मातेच्या कृपाशीर्वादाने सर्व माता-भगिनींचा समाधानाने प्रवास होवो. सर्व वारकऱ्यांच्या वारीचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होवो, हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली आहे, असेदेखील यावेळी गोऱ्हे यांनी सांगितले.
पुण्यातील शिवसेनेचे स्थान भक्कम : पुण्यातील शिवसेनेचे स्थान भक्कम असून, शिवसैनिकांचे कार्य नेहमीच उत्तम पद्धतीने सुरू असते. सांगली जिल्ह्यात वारकऱ्यांना झालेल्या अपघातात जखमी लोकांची चौकशी करून त्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत स्व-निधीतून डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केली आहे.
हेही वाचा : Badrinath Kund: बद्रीनाथ तप्त कुंडाच्या पाण्यातील शेवाळातून दुर्मिळ प्रजातीचा लावला शोध