पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्याला इतिहासाचा मोठा वारसा आहे. विविध धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे असे एक वेगळे रूप या तालुक्याचे आहे. त्यामुळे या तालुक्याचे नामकरण जुन्नरऐवजी शिवनेरी करावे, अशी मागणी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
हेही वाचा... अनिल गोटे यांचा राष्ट्रवादीत होणार अधिकृत प्रवेश
जुन्नर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी ही पवित्र भूमी आहे. या भूमीचा महाराष्ट्रातील प्रत्येकाला एक वेगळा अभिमान आहे. त्यामुळे आमदार अतुल बेनके यांनी मांडलेला प्रस्तावाचा विचार राज्यसरकार निश्चित करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज गुरुवारी किल्ले शिवनेरीवर आले होते. यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, आमदार अतुल बेनके आदी नेते उपस्थित होते.
हेही वाचा... नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचे पडसाद, ईशान्येकडील राज्यात आंदोलन
जुन्नर तालुक्यातील पर्यटन वाढावे, शेती उद्योगाला चालना मिळावी, अशा विविध मागण्यांची निवेदने आमदार बेनके यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. पुढील काळात शिव जन्मभूमीतील लोकांना दिलेली आश्वासने वेळोवेळी विधानसभेत मांडणार असल्याचेही अतुल बेनके यांनी सांगितले.
हेही वाचा... B'Day Special : बारामतीकारांनी अनुभवलेले शरद पवार...