ETV Bharat / city

ओशो आश्रम नष्ट करण्याचे कारस्थान, कमलेश पांडे यांचा आरोप - kamlesh pande

पुण्यातील ओशो आश्रम नष्ट करण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप करत आश्रमासंदर्भातील सर्व प्रकरणांची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी ओशो फॉरेव्हरचे अध्यक्ष व चित्रपट लेखक कमलेश पांडे यांनी केली आहे. ओशोंचा वारसा हा केवळ भारताचा नसून संपूर्ण जगाचा वारसा आहे. ओशोंची समाधी ओशो संन्यासी व ओशो प्रेमींसाठी काशी किंवा मक्का मदीनाएवढीच प्रिय आहे. आम्हाला ओशो समाधीपर्यंत जाण्यास बंदी करुन आमच्या धार्मिक अधिकारांपासून वंचित केल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला.

ओशो आश्रम नष्ट करण्याचे कारस्थान, कमलेश पांडे यांचा आरोप

author img

By

Published : Aug 13, 2021, 3:19 PM IST

Updated : Aug 13, 2021, 7:53 PM IST

पुणे : येथील ओशो आश्रम नष्ट करण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप करत आश्रमासंदर्भातील सर्व प्रकरणांची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी ओशो फॉरेव्हरचे अध्यक्ष व चित्रपट लेखक कमलेश पांडे यांनी केली आहे. ओशोंचा वारसा हा केवळ भारताचा नसून संपूर्ण जगाचा वारसा आहे. ओशोंची समाधी ओशो संन्यासी व ओशो प्रेमींसाठी काशी किंवा मक्का मदीनाएवढीच प्रिय आहे. आम्हाला ओशो समाधीपर्यंत जाण्यास बंदी करुन आमच्या धार्मिक अधिकारांपासून वंचित केल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला.

ओशो आश्रम नष्ट करण्याचे कारस्थान, कमलेश पांडे यांचा आरोप

फाऊंडेशनच्या ट्रस्टींवर भ्रष्टाचाराचे आरोप

ओशो फाउंडेशन इंटरनॅशनल आणि नवसंन्यास (रजनीश) फाउंडेशनचे ट्रस्टी आणि वर्तमान प्रबंधन टीमने १८०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या कागदपत्रांची तपासणी आपण वेबसाईटवर सुद्धा करू शकता असे पांडे यांनी म्हटले आहे. ओशोंची जगभरातील वेगवेगळ्या ६० ते ७० भाषांमध्ये अनुवादित झालेल्या ग्रंथसंपदेची रॉयल्टी कुठे जात आहे? याची चौकशी व्हावयास हवी. आमची मागणी केवळ ओशोंचा आश्रम विकण्यापासून वाचविण्याची नसून या सर्व प्रकाराची सीबीआय व ईडीमार्फत सखोल चौकशी व्हावयास हवी अशी मागणी कमलेश पांडे यांनी केली आहे.

यांची पत्रकार परिषदेत उपस्थिती
या पत्रकार परिषदेला स्वामी गोपाळ भारती (प्रवक्ता-ओशो फॉरेव्हर तसेच गीतकार),ओमप्रकाश पांडे ( ओशो फॉरेव्हर),स्वामी झोरबा (ओशो संन्यासी)मा ध्यान साधना,मा अग्नी (संन्यासी),स्वामी प्रेम उत्थान(संन्यासी),मा बोधी प्रतिमा ,स्वामी ओम प्रकाश भारती, स्वामी प्रेम अक्षय ,विठ्ठल कदम (समन्वयक) यांची उपस्थिती होती. ओशोंना एक रहस्यदर्शी सद्गुरु न मानता त्यांना केवळ एका लेखकाच्या स्वरूपात सादर केले जात आहे. हे कारस्थान यासाठी रचले जात आहे कि, येणाऱ्या पिढीने त्यांना विसरून जावे असा आरोप पत्रकार परिषदेतून करण्यात आला.

हेही वाचा - पुण्यात यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणानेच; मंडळांना ऑनलाईन परवाने

Last Updated : Aug 13, 2021, 7:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.