पिंपरी-चिंचवड: राम गोमारे हिंजवडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे असलेली उर्जाशक्ती आणि योग्य व्यायाम हे गोरे यांना स्वस्त बसू देत नव्हते. त्यामुळेच त्यांनी त्यांना आदर्श मानून सायकलिंगसह, स्विमिंग, धावणे सुरू केले.
त्यांनी अनेक पोलीस सहकार्यांना यात सहभागी करून त्यांना देखील योग्य व्यायामाची किती गरज आहे हे पटवून दिले आहे. राम गोमारे यांनी देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन पंढरपूर च्या दिशेने सायकलवरून कूच केली.

पहाटे सुरू केलेल्या सायकल चा प्रवास त्यांनी थेट विठुरायाच दर्शन घेऊन थांबवला. त्यांनी देहू ते पंढरपूर असा 234 किलोमीटर प्रवास हा सायकलवरून केला आहे. सर्वसामान्य व्यक्तींच्या आयुष्यात आणि पोलीस बांधावसाठी फिटनेस अत्यंत महत्वाचा असल्याने त्याला महत्व द्या असा संदेश त्यांनी यातून दिला आहे.
हेही वाचा : World record performance : दृष्टीहीन सायकलपटूची जनजागृतीसह विश्वविक्रमी कामगिरी