ETV Bharat / city

'डेक्कन क्वीन'ला 91 वर्ष पूर्ण; हर्षा शहा गेल्या 67 वर्षांपासून केक कापून करतायेत वाढदिवस साजरा - हर्शा शहा बातमी

पुणे-मुंबई शहराला जोडण्यासाठी एक जून १९३० रोजी सुरु झालेल्या डेक्कन क्वीनला ९१ वर्षे पूर्ण झाली आहेत. डेक्कन क्वीनने आता 92 व्या वर्षात प्रदार्पण केलं आहे.

Deccan Queen turns 91 today
डेक्कन क्वीनला आज 91 वर्ष पूर्ण
author img

By

Published : Jun 1, 2021, 3:49 PM IST

Updated : Jun 1, 2021, 6:13 PM IST

पुणे - पुणे-मुंबई शहराला जोडण्यासाठी एक जून १९३० रोजी सुरु झालेल्या डेक्कन क्वीनला ९१ वर्षे पूर्ण झाली आहेत. डेक्कन क्वीनने आता 92 व्या वर्षात प्रदार्पण केलं आहे. डेक्कन क्वीनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रेल्वे प्रवासी ग्रुपच्यावतीने आज केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा मागील 67 वर्षांपासून डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करत आहेत.

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा
  • यंदा ६७ वे वर्ष -

हर्षा शहा यांचे काका शांतिलाल शहा व्यवसायानिमित्त पुणे-मुंबई असा नियमित प्रवास करत होते. त्यांनी १९५४ मध्ये पहिल्यांदा डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा केला होता. त्या वेळी हर्षा शहा हे पाच वर्षांच्या होत्या. तेव्हापासून दर वर्षी त्या डेक्कन क्वीनच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. काकांच्या पश्चात त्यांनी स्वत: वाढदिवस साजरा करण्याची परंपरा सुरू ठेवली. वाढदिवस साजरा करण्याचे हे ६७ वे वर्षे आहे.

  • डेक्कन क्वीनचा प्रतिकात्मक वाढदिवस साजरा

ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे कंपनीने पहिली 'लक्झरिअस सेवा' म्हणून पुणे-मुंबई मार्गावर डेक्कन क्वीनची सेवा सुरू केली होती. महाराजा एक्स्प्रेस, डेक्कन ओडिसी, 'पॅलेस ऑन व्हील्स' यांसारख्या महागड्या गाड्यांमध्ये असलेल्या अनोख्या 'डायनिंग कार'चा डेक्कन क्वीनमध्ये समावेश आहे. त्यामुळे डेक्कन क्वीनला इतर इंटरसिटी गाड्यांपेक्षा वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. दर वर्षी एक जूनला ही गाडी मुंबईला रवाना होण्यापूर्वी रेल्वे प्रवासी ग्रुप आणि पुणे ते मुंबई या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठ्या थाटात केक कापून वाढदिवस साजरा केला जातो. नेहमीचे प्रवासी गाडीची अंतर्बाह्य सजावट करतात. गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे रेल्वेची सेवा बंद होती. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकात प्रतिकात्मक वाढदिवस साजरा केला होता. त्याचप्रमाणे यंदाही वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

  • आत्ता डेक्कन क्वीनला आधुनिक रुप द्यावं - हर्षा शहा

पुणे-मुंबई दरम्यान दररोज रेल्वेने ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली दख्खनची राणीने (डेक्कन क्वीन) ९२ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. कोरोनामुळे यंदाही डेक्कन क्वीन मुंबईतील यार्डातच असली, तरीही वाढदिवसाची परंपरा खंडित झाली नाही. डेक्कन क्वीनचा डायनिंग कारला विस्कॉट डोरचा कोच देण्यात येणार आहे. वंदे मातरम, तेजस रेल्वेसारख्या जे लेट्स रेल्वे आहेत त्यापेक्षा जास्त असलेल्या बुलेट ट्रेनचे रॅप हे डेक्कन क्वीनला देण्यात यावे आणि आधुनिक टेक्नॉंलॉजीचा आणि थ्रीडीचा वापर करून आता डेक्कन क्वीनला एक वेगळं रूप द्यावं, अशी अपेक्षाही यावेळी हर्षा शहा यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - अभिनेता करण मेहराला अटक; पत्नीने केली होती तक्रार

Last Updated : Jun 1, 2021, 6:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.