पुणे - नारायणगाव येथील वैद वस्ती परिसरात सुरेश सखाराम घाडगे वय (वर्ष ४०) हे सकाळी विहिरीवरील पाण्याची मोटर चालू करण्यासाठी गेले असता, विजेच्या शॉक बसून ते विहिरीत कोसळले व त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने वैद्य वस्ती परिसरात शोककळा पसरली आहे. नारायणगाव ग्रामपंचायतीत निम्या घरांना पाणीपुरवठा होत नाही, वेळोवेळी निवेदने देवुनही आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज ही घटना घडली आहे, असा आरोप वैद वस्ती ग्रामस्थांनी केला आहे.
आई-वडील वृद्ध असल्यामुळे रोज सकाळी मोटर सुरू करण्यासाठी स्वत: जात
सुरेश सखाराम घाडगे वय (वर्ष ४०) हे सकाळी विहिरीवरील पाण्याची मोटर चालू करण्यासाठी गेले होते. विजेच्या शॉक बसून ते विहिरीत कोसळले व त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आई-वडील वृद्ध असल्यामुळे रोज सकाळी मोटर सुरू करण्यासाठी ते जात असत. परंतु आज ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी व तीन भाऊ असा परिवार आहे.
'आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, आज ही घटना घडली आहे'
'वैद वस्ती परिसरात निम्म्या घरांना नारायणगाव ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा होत नाही. येथील नागरिकांनी वेळोवेळी नारायणगाव ग्रामपंचायतीला या संदर्भात निवेदने दिले, संपर्क केला. परंतु त्यांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, आज ही घटना घडली आहे', असा आरोप वैद वस्ती ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेला नारायणगाव ग्रामपंचायत जबाबदार आहे. असा स्पष्ट आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला. तर या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य सारिका डेरे यांच्याशी संपर्क केला असता, ग्रामस्थांकडून माझ्याशी कोणतीही चर्चा झाली नाही व त्यांनी मला कुठलाही अर्ज दिला नाही, असे सांगून त्यांनी ग्रामस्थांचे आरोप फेटाळले आहेत. या संपूर्ण विषयात ग्रामपंचायत पाणीपुरवठा करत नसल्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. असा ग्रामस्थांचा स्पष्ट आरोप आहे. त्यामुळे भविष्यात वैद वस्ती परिसरात ग्रामपंचायत पाणीपुरवठा करणार काय? असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होत आहे.
हेही वाचा - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रुग्णालयाला आमदार निधीतून दिले एक कोटी