पुणे : दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संग्राम डांगे ( Medical Superintendent Arrest) हे लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाच्या ताब्यात सापडले (ACB arrested for Taking bribe) आहेत . डॉक्टर बरोबरच एका शिपायाला ही लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे. दुबार विवाह नोंदणी प्रमाणपत्र (marriage registration certificate) देण्यासाठी या लाचेची मागणी (Demand bribe) करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे . या घटनेने दौंड मध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Medical Superintendent Bribe Case Daund)
शिपाई आणि डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात - याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संग्राम डांगे हे आणि रुग्णालयातील एक शिपाई नानासाहेब पांडुरंग खोत हे दोघे रंगेहाथ लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. 5 हजार रुपयांतील संग्राम डांगे याच्यासाठी 3 हजार रुपये तर खोत हे 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक विरनाथ माने, पोलीस शिपाई दिनेश माने, भूषण ठाकुर, चालक प्रकाश तावरे यांच्या पथकाने केली आहे.
गेल्या आठ दिवसांत दौंड मध्ये दुसरी रेड : दौंडमध्ये गेले काही दिवसांत लाचेची मागणी करताना शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांवर अँटी करप्शन विभागाने कारवाई करण्याची ही दुसरी घटना घडली आहे . दौंड तहसीलदार कार्यलयातील एक कर्मचारी 10 ऑक्टोबर रोजी 4 हजरांची लाच स्वीकारताना अँटी करप्शन च्या पथकास रंगेहाथ सापडला होता. यानंतर आज दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि एक शिपाई लाच स्वीकारताना सापडले आहेत. या दोन्ही घटनांमुळे तालुक्यातील सर्वसामान्य जनतेत लाचखोरी च्या चर्चांना उधाण आले आहे.