ETV Bharat / city

दगडखाण कामगारांच्या मुलांनी उत्साहात केली दहिहंडी साजरी

गोविंदा रे गोपाळा, या पारंपरिक बँडवर वाजवलेल्या गाण्यांवर चिमुकल्यांचे पाय थिरकले आणि त्यांनी मोठया उत्साहात दहीहंडी फोडली. कसबा पेठेतील दहीहंडीच्या उत्सवात खराडी येथील संतुलन पाषाण या संस्थेतील दगडखाण कामगारांच्या मुलांनी सहभागी होत जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा केला.

दगडखाण कामगारांच्या मुलांनी उत्साहात केली दहिहंडी साजरी
दगडखाण कामगारांच्या मुलांनी उत्साहात केली दहिहंडी साजरी
author img

By

Published : Aug 31, 2021, 8:23 PM IST

पुणे - गोविंदा आला रे आला, गोविंदा रे गोपाळा, या पारंपरिक बँडवर वाजवलेल्या गाण्यांवर चिमुकल्यांचे पाय थिरकले आणि त्यांनी मोठया उत्साहात दहीहंडी फोडली. कसबा पेठेतील दहीहंडीच्या उत्सवात खराडी येथील संतुलन पाषाण या संस्थेतील दगडखाण कामगारांच्या मुलांनी सहभागी होत जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा केला.

दगडखाण कामगारांच्या मुलांनी उत्साहात केली दहिहंडी साजरी

कार्यक्रमाचे यंदा २० वे वर्ष

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे कै. सौ. प्राची प्रकाश काळे स्मरणार्थ आपली दहीहंडी आणि माता यशोदा सन्मान सोहळ्याचे आयोजन कसबा पेठेतील माणिक चौकाजवळील अमेय सोसायटीच्या आवारात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे यंदा २० वे वर्ष आहे.

भीमसेन जोशी जन्मशताब्दी

पारंपरिक वेशात चिमुकले कोविडविषयी सर्व नियम पाळून उत्सवात सहभागी झाले होते. संतुलन पाषाण संस्थेला धान्यरुपी गोपाळकाला मदत म्हणून देण्यात आला. शिवभूषण निनादराव बेडेकर यांच्या स्मरणार्थ स्वरगोकुळ हा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी वर्षानिमित्त विरासत की महिमा हा संजय गरुड यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. पंडित शिवदास देगलूरकर, रोहन शेटे, माऊली फाटक, संकेत फाटक यांनी साथसंगत केली. समस्त नामदेव शिंपी दैव मंडळ कसबा पेठ, मॉडर्न कॉलेज आॅफ आर्टस् सायन्स अ‍ँड कॉमर्स (डब्ल्यू.सी.बी.एस.), श्री दत्त आनंद परिवार यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.