ETV Bharat / city

पुण्यात मंदिर उघडल्यानंतर पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी, भाजपकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - मंदिरात भाजपकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या कार्यकर्त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून देण्यात आलेल्या नियमांचा विसर पडला असल्याचे दिसून आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात हे कार्यकर्ते एकमेकांना धक्काबुक्की करत पुढे सरकत होते आणि हे करत असताना त्यांच्यामध्ये सोशल डिस्टंसिंगचा मात्र पत्ता नव्हता.

crowd-of-devotees-on-the-first
पुण्यात मंदिर उघडल्यानंतर पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी
author img

By

Published : Nov 16, 2020, 5:09 PM IST

पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील आठ महिन्यापासून बंद असलेली धार्मिक स्थळे उघडण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर आजपासून संपूर्ण राज्यातील धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर मोठ्या उत्साहात आणि भक्तांच्या गर्दीमध्ये खुली करण्यात आली आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आज पहाटे पाच वाजता भाविकांसाठी उघडले गेले.

पुण्यात मंदिर उघडल्यानंतर पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे कडक पालन -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करीत भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात होता. हात सॅनिटाईझ करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. मंदिराबाहेर भाविकांची गर्दी असली तरी स्वयंसेवकांकडून सोशल डिस्टंसिंग राखण्याचे आवाहन केले जात होते आणि भाविकांकडून त्याचे पालनही केले जात होते. परंतु साडेनऊच्या सुमारास महाआरतीसाठी आलेल्या भाजप कार्यकर्त्यानी मात्र या सर्व नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले.

भाजप कार्यकर्त्यांकडून नियमांचा भंग -

भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या कार्यकर्त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून देण्यात आलेल्या नियमांचा विसर पडला असल्याचे दिसून आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात हे कार्यकर्ते एकमेकांना धक्काबुक्की करत पुढे सरकत होते आणि हे करत असताना त्यांच्यामध्ये सोशल डिस्टंसिंगचा मात्र पत्ता नव्हता. हीच परिस्थिती मास्कच्या बाबतीत होती. भाजप कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीतच महाआरती पार पडली. परंतु आपण नियमभंग केल्याचे खंच ना शहराध्यक्षांना होती ना कार्यकर्त्यांना.

यावेळी बोलताना जगदीश मुळीक म्हणाले, मंदिरात गर्दी झाली ही सर्व चुक राज्य सरकारची आहे. आम्ही सातत्यानं मंदिर उघडण्यात यावी, यासाठी आंदोलने केली आहेत. त्यामुळे आज मंदिरात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्याप्रमाणे मॉल, रेस्टॉरंट चालू झाले तेव्हाच मंदिरं उघडली असती तर आज इतकी गर्दी झाली नसती. त्यामुळे या सर्व गर्दीला राज्य सरकार जबाबदार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.