ETV Bharat / city

पुण्यात उद्यापासून 'लॉकडाऊन', खरेदीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी - lockdown in pune

उद्यापासून मुख्य शहरासह पिंपरी-चिंचवडमध्ये दहा दिवसाचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. यावेळी लॉकडाऊन पूर्वीपेक्षा जास्त कडकपणे राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे फळे भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केलीय.

market yard pune
फळे भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केलीय.
author img

By

Published : Jul 13, 2020, 12:41 PM IST

पुणे - उद्यापासून मुख्य शहरासह पिंपरी-चिंचवडमध्ये दहा दिवसाचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. यावेळी लॉकडाऊन पूर्वीपेक्षा जास्त कडकपणे राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

फळे भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केलीय.

या काळात फक्त दुध आणि औषध वगळता अन्य सर्व दुकाने बंद असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी शहरातील बाजारात गर्दी केलीय. पुण्याच्या गुलटेकडी येथील फळबाजारात आज सकाळपासूनच नेहमीपेक्षा जास्त गर्दी आहे. भाजीपाला आणि फळ विकत घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात या बाजारपेठेत आलेत. अचानक गर्दी वाढल्याने या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांवर ताण पडलाय. गर्दी वाढल्याने कोणतेही सोशल डिस्टन्सिंग होत नाहीय.

भाज्यांच्या किंमती वाढल्या

आज पहाटेपासून मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने फळभाज्यांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संताप निर्माण झालाय. आधीच तीन महिन्यांपासून काम धंदा नाही आणि अशा परिस्थितीत इतक्या महाग पालेभाज्या आम्ही कशा खरेदी करायचा असा प्रश्नही ग्राहकांकडून विचारण्यात येतोय.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.