पुणे - एकीकडे देशात कोरोना लसीकरणाचा ( Covid19 Vaccine ) वेग वाढत असतानाच पुण्यात मात्र कोवॅक्सिन लसींचा ( Covaxin Shortage In Pune ) साठा संपला आहे. सध्या शहरातील कुठल्याच लसीकरण केंद्रावर कोवॅक्सिन लसी शिल्लक नाहीत. असे देखील आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
15 ते 18 वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण बंद -
लसीचा साठा शिल्लक नसल्याने शुक्रवारी शहरात 15 ते 18 वयोगटातील लाभार्थ्यांच लसीकरण होणार नाही आहे. कोवॅक्सिन लसींचा पुरवठा न झाल्याने कोवॅक्सिन लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत.
पुण्यात लसीचा तुटवडा -
एकीकडे देशभरात लसीकरणाची मोहिम जोरात आणि जोमात सुरू आहे. मात्र पुण्यात बऱ्याच ठिकाणी आता लसीचा तुटवडा जाणवत आहे आणि याचा नाहक त्रास सामान्य जनतेला सहन करावा लागतो आहे. तर दुसरीकडे १० वी व 12 वीच्या परीक्षा काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. यात कोरोनाच्या परिस्थिती ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे देखील तितकचे महत्त्वाचे आहे. मात्र पुण्यात लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे.
हेही वाचा - Bogus Schools : राज्यातील अनेक शाळा बोगस; शिक्षण तज्ज्ञ म्हणतात...