ETV Bharat / city

खोटे शपथपत्रप्रकरणी चंद्रकांत पाटलांना न्यायालयाची क्लीन चिट

कोथरूड विधानसभा निवडणूक जिंकल्यावर चंद्रकांत पाटील यांनी खोटे शपथपत्र दाखल केले, असा आरोप करत अभिषेक हरिदास यांनी भारतीय लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १२५ (अ) अन्वये चंद्रकांत पाटलांच्या निवडीविरुद्ध दाद मागितली होती.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Jan 19, 2021, 3:29 PM IST

पुणे - कोथरूड विधानसभा निवडणूक जिंकल्यावर चंद्रकांत पाटील यांनी खोटे शपथपत्र दाखल केले, असा आरोप करत अभिषेक हरिदास यांनी भारतीय लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १२५ (अ) अन्वये चंद्रकांत पाटलांच्या निवडीविरुद्ध दाद मागितली होती. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २०२ अंतर्गत पुण्यातील फौजदारी न्यायालयात याबाबतचा खटला दाखल करण्यात आला होता. दरम्यान, न्यायाधीश जान्हवी केळकर यांनी विस्तृत निकालपत्रात पाटील यांच्या विरुद्धचे सर्व आरोप फेटाळून लावले व तक्रार काढून टाकत खटला निकाली काढला आहे.

न्यायाधीशांनी तक्रारदाराचे म्हणणे फेटाळले-

तक्रारदाराच्या सर्व तक्रारींची व सोबतच्या साक्षी पुराव्यांची शहानिशा करुन न्यायालयाने निरीक्षण नोंदविताना पाटील यांचे विरुद्धचे सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. पाटील यांनी शपथपत्रात जोडलेली आयकर विवरणपत्र योग्य असल्याचे निरीक्षण नोंदविले. तसेच निवडणूक लढवत असताना चंद्रकांत कोणत्याही लाभाच्या पदावर नसल्याने हा दावा ही फेटाळण्यात आला. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील ज्या पदांवर पदसिद्ध होते. त्या पदावरील व्यक्तीस मानधन मिळत नसल्याने शपथपत्रात उत्पन्न लपविले, असे म्हणणे देखील अयोग्य असल्याचे ही निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या विरुद्ध कोल्हापूरच्या न्यायालयात दाखल गुन्हा प्रकरणी देखील न्यायाधीशांनी तक्रारदाराचे म्हणणे फेटाळले आहे.

अखेर सत्याचाच विजय होतो- चंद्रकांत पाटील

यासंर्दभात आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, एका सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा राज्यातील महत्त्वाच्या खात्यांचा मंत्री होतो. भाजपचा प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत वाटचाल करतो. हे काही हितशत्रूंना मानवत नाही आणि त्यातून माझ्याविरुद्ध कुभांड रचले जाते व मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो.

मात्र अखेर सत्याचाच विजय होतो. हे न्यायालयाच्या निकालाने दाखवून दिले असल्याचे मत आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. अश्या आरोपांची आता सवय झाली असून अश्या खोट्या आरोपांमुळे अनावश्यक मानसिक त्रास होतो. मात्र अश्या कट कारस्थानातून मी अधिक तावून सुलाखून बाहेर पडतो. व समाजसेवेचे जे व्रत स्वीकारले आहे. ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा सज्ज होतो, असे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा- कोरोना लस घेतल्यानंतर कर्मचाऱ्याचा मृत्यू, आरोग्य मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण

हेही वाचा- हिंदू धर्मियच धर्माला बदनाम करण्यासाठी कारणीभूत - राजू श्रीवास्तव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.