पुणे - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आमदार पदाच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावण्यात येत आहेत. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक जावेद शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी या संदर्भात शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे पत्र सुपूर्द केले आहे.
शुक्रवारी अचानक माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आणि नेते वैयक्तिक पातळीवर अजित पवार यांच्याशी जोडले गेले आहेत. अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांनीही आपण राजीनामा देत असल्याचे पत्र शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे दिले.
यावेळी, 'आमचे मार्गदर्शक जिथे नाहीत, तिथे आम्ही तरी का थांबायचे', असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा पिंपरी-चिंचवड : सत्ताधारी भाजप नगरसेवकावरच उपोषणाची वेळ; राष्ट्रवादीचा पाठिंबा
अद्याप हा राजीनामा शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याखाली विचारधीन असून, नगरसेवक शेख यांची ते समजूत काढणार असल्याचे म्हणाले आहेत.
हेही वाचा चिंचवड विधानसभेतून तृतीयपंथी निवडणूक लढणार
काही वेळानंतर पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. यामध्ये शहरातील महत्त्वाचे कार्यकर्ते, नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मात्र, बैठकीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.