पुणे : संपूर्ण जगासह देशात देखील कोरोनाचं थैमान सुरूच आहे. त्यातच वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कोरोनाचे सापडत असलेल्या नव्या व्हेरीऐंटमुळे जगाच्या अनेक देशांची चिंता अधिकच वाढताना दिसत आहे. आधी डेल्टा मग ओमायक्रॉन आणि आता डेलमायक्रॉन हा नवीन व्हेरीऐंट ( Delmicron new variant ) आला आहे. कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटशी झुंज देत असलेल्या जगासमोर आता डेलमायक्रॉन या नवीन प्रकाराचा धोका वाढला आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये सतत वाढणाऱ्या कोविड संसर्गामागे डेलमायक्रॉन हा नवीन प्रकार असल्याचा संशय अनेकांकडून बोललं जात आहे.
Delmicron : कोरोनाचा नवा विषाणू "डेलमायक्रॉन" धोका वाढला? - इंडियन मेडिकल असोसिएशन
सध्या कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने धोका वाढला आहे. त्याचबरोबर आता डेलमायक्रॉन नवा व्हेरीऐंट ( Delmicron new variant ) आल्याची देखील चर्चा देखील आहे. त्यामुळे याबाबत संभ्रमता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यापर्यंत तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता देखील वर्तवली जात आहे.