पुणे - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. पुणे विमानतळावर चिनी प्रवासी हा 'कोरोना'चा संशयित रुग्ण आढळला आहे. दरम्यान, आज(शुक्रवार) सकाळी दिल्लीहून पुण्याला येण्यासाठी निघालेल्या 'एअर इंडिया'च्या विमानात 177 प्रवासी होते. त्यापैकी चीनचा नागरिक असलेल्या एका प्रवाशाला अस्वस्थ वाटू लागले आणि त्याने उलट्या केल्या. हे विमान पुणे विमानतळावर पोहचल्यानंतर 'ली सियोन' या चिनी प्रवाशाला नायडू रुग्णालयात हलवण्यात आले
हेही वाचा - शिवरायांच्या जयंतीचा वाद थांबविणे गरजेचे - शिवेंद्रराजे भोसले
दरम्यान, हे विमान पुन्हा दिल्लीला जाणार होते. मात्र, चिनी प्रवाशाने केलेल्या उलट्यांमुळे विमान स्वच्छ करायला वेळ लागला. त्या विमानाने दिल्लीला जाणार असलेल्या प्रवाशांनी विमानाला उशीर का होतोय, याची चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला. नायडू रुग्णालयात भरती करण्यात आलेला चिनी प्रवासी हा मागील एक महिन्यापासून दिल्लीत असल्याचा दावा करत आहे.
हेही वाचा - शासनाचा पुरवठा आदेशच नाही, हिंगोलीचे लिडकॉम उत्पादन केंद्र अच्छे दिनच्या प्रतीक्षेत
या कोरोना संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच त्याला कोरोनाची लागण झाली की नाही, हे स्पष्ट होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच या प्रवाशाच्या संपर्कात आलेल्या प्रवाशांनी न घाबरण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.