पुणे - कोरोनाची बाधा झालेल्या एका महिलेची ससून रुग्णालयात शुक्रवारी (18 एप्रिल) प्रसूती झाली. सिझेरियनद्वारा ही प्रसूती करण्यात आली असून नवजात बाळाला कोरोनाची लागण झालेली नाही. या बाळाचे वजन 3.5 किलो असून प्रकृतीही उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वेगळ्या कक्षामध्ये डॉक्टर व नर्स या बाळाची काळजी घेत आहेत.
तसेच कोरोनाची बाधा झालेल्या पाच लहान मुलांवर देखील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मुलांवर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली स्वतंत्र कक्षात उपचार सुरू आहेत. संबंधितांची विशेष काळजी घेण्यासोबतच त्यांना प्रबोधनात्मक आणि मनोरंजनाची पुस्तकेही रुग्णालय प्रशासनाच्या वतीने भेट देण्यात आली आहेत.
ससून रुग्णालयात 90 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 25 रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. या सर्व रुग्णांच्या देखरेखीसाठी 31 वरिष्ठ डॉक्टर, 70 निवासी डॉक्टर आणि 76 परिचारिका कार्यरत आहेत. ससून रुग्णालयात आतापर्यंत 42 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय.
कोरोनाबाधित महिलेची ससून रुग्णालयात प्रसूती, नवजात बाळ सुखरुप - corona in pune
कोरोनाची बाधा झालेल्या एका महिलेची ससून रुग्णालयात शुक्रवारी (18 एप्रिल) प्रसूती झाली. सिझेरियनद्वारा ही प्रसूती करण्यात आली असून, नवजात बाळाला कोरोनाची लागण झालेली नाही.