पुणे- ८ मेच्या आकडेवारीनुसार पुणे विभागात ८३७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता विभागात कोरोनाबाधितांची संख्या ही २ हजार ८८५ इतकी झाली आहे. तर, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही १ हजार ८९१ इतकी आहेत. विभागात एकूण १५७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तसेच ९१ रुग्ण गंभीर असून उर्वरित रुग्ण निरीक्षणाखाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यात २ हजार ५३७ कोरोनाबाधित रुग्ण असून १४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ७६२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ही १ हजार ६३४ इतकी आहे, तर ८६ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. सातारा जिल्ह्यात ११४ कोरोनाबाधित रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ही ९८ आहे. सोलापूर जिल्ह्यात १८२ कोरोनाबाधित रुग्ण असून १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर २९ कोरोनाबाधित रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ही १४१ इतकी आहे.
तसेच, सांगली जिल्ह्यात ३७ कोरोनाबाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर २६ कोरोनाबाधित रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही १० इतकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १५ कोरोनाबाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर ६ कोरोनाबाधित रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ही ८ इतकी आहे. आजपर्यंत विभागात एकूण २९ हजार ३१९ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी २७ हजार ७९५ अहवाल प्राप्त झाले आहेत. १ हजार ५२४ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी २४ हजार ९३० नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून २ हजार ८८५ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत विभागात ८५ लाख २३ हजार ७१२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत ३ कोटी ४६ लाख ४६ हजार ५०६ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी २ हजार ७४ व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे.
हेही वाचा- इतना सन्नाटा क्यूं है भाई! रमजान महिन्यात गजबजून जाणारे परिसर यंदा शांत