ETV Bharat / city

पुण्यात एसआरपीएफ परीक्षेत ब्लूटूथद्वारे कॉपी; आरोपीला हडपसर पोलिसांनी केली अटक - ब्लूटूथ कॉपी पुणे

राज्यात आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरण आणि त्यांनतर काल म्हाडा पेपर फुटी प्रकरण ताजे असताना पुण्यात काल एका परिक्षेत ब्लूटूथद्वारे कॉपी करण्याचा प्रकार घडला आहे. एस.एम. जोशी महाविद्यालयात हा प्रकार घडला. येथे एक भावाने आपल्याच भावाच्या नावावर एसआरपीएफ परीक्षेला बसून ब्लूटूथद्वारे कॉपी केली.

Hadapsar Police Station Pune
हडपसर पोलीस स्टेशन पुणे
author img

By

Published : Dec 13, 2021, 8:17 PM IST

पुणे - राज्यात आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरण आणि त्यांनतर काल म्हाडा पेपर फुटी प्रकरण ताजे असताना पुण्यात काल एका परिक्षेत ब्लूटूथद्वारे कॉपी करण्याचा प्रकार घडला आहे. एस.एम. जोशी महाविद्यालयात हा प्रकार घडला. येथे एक भावाने आपल्याच भावाच्या नावावर एसआरपीएफ परीक्षेला बसून ब्लूटूथद्वारे कॉपी केली. हडपसर पोलिसांनी या कॉपी करणाऱ्या भावाला अटक केली आहे. विशाल गबरुसिंग बहूरे (रा. औरंगाबाद) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा - युती असतानाही तुम्ही 'सामना'मधून शिव्या आणि शाप देतच होते; चंद्रकांत पाटलांचे संजय राऊतांना प्रतिउत्तर

भावाच्या बदल्यात ब्लूटूथद्वारे देत होता परीक्षा

काल एस.एम. जोशी महाविद्यालयात भरतसिंग बहुरे याचा एसआरपीएफचा पेपर होता. या परीक्षेसाठी एकूण 480 परीक्षार्थी आले होते. यात एकूण 20 पर्यवेक्षकांची निवड करण्यात आली होती. त्या पर्यवेक्षकांपैकी एक अनुप पवार यांना परीक्षा केंद्रावर काहीतरी गडबड होत असल्याचे लक्षात आले. त्यांनी चौकशी केली असता विशाल गबरुसिंग बहूरे हा परीक्षार्थी ब्लूटूथद्वारे बोलत असल्याचे आढळले. त्याची सखोल चौकशी केली असता विशाल बहूरे हा आपल्याच भावाच्या बदल्यात परीक्षा देत असल्याचे समोर आले.

मुख्य परीक्षार्थी भरतसिंग बहूरे अजूनही फरार

भरतसिंग बहूरेच्या जागी त्याचा भाऊ विशाल गबरुसिंग बहूरे हा पेपरला बसला होता. परीक्षा सुरू असताना हॉलमध्ये पर्यवेक्षक यांना काही कुजबुज सुरू असल्याचे लक्षात आले. त्यावेळी आरोपी विशाल याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची तपासणी केल्यावर तो मुख्य परीक्षार्थी नसल्याचे समजले आणि त्याच्याकडे ब्लूटूथ आणि इतर साहित्य मिळून आले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. परीक्षा हॉल परिसरात भरतसिंग बहूरे हा देखील होता, मात्र त्याच्या लक्षात येताच, तो तेथून पळून गेला. आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

हेही वाचा - ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव येत्या २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.