पुणे - अभिनेते शरद पोंक्षे यांच्याविरोधात Actor Sharad Ponkshe पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जाहीर कार्यक्रमात हिंदू समाजाबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सोशल मीडिया Maharashtra Pradesh Congress Committee व सहकार विभागाकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. डोंबिवली येथे झालेल्या एका कार्यक्रमात पोंक्षे यांनी 'अहिंसा परमो धर्म:'चे एवढे ढोस आम्हाला पाजले की, हा हिंदू समाज अहिंसक होता होता नपुसंक कधी झाला, हे आम्हाला कळलचे नाही, असे वक्तव्य केले आहे. हिंदू कधी नपुंसक झाला हे कळालेच नाही, असे विधान करत त्यांनी हिंदूंना चिथावणी दिली असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
काही महिण्यापूर्वी राहुल गांधींवर केली होती टीका : पोंक्षेंनी मागील महिन्यात पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली होती. त्यामुळे वादग्रस्त आणि चिथावणीखोर विधानाविरोध भारतीय दंड संहिता कलम 298, कलम 295(अ), कलम 153(ब) नुसार शरद पोंक्षेंवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे पदाधिकारी बळीराम डोळे, शकाका मारकड, श्रीविजय हुलवान, योगेश फुले आदींनी ही तक्रार दिली आहे.
हेही वाचा - Sharad Ponkshe criticized Rahul Gandhi : अभिनेता शरद पोंक्षेची राहुल गांधीवर टीका; म्हणाले...