पुणे - भोर निरा डाव्या कालव्याच्या भुमिपुजनाचा श्रेयवादवरुन सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यात काँग्रेसचे आंदोलन झाले आहे. सुप्रिया सुळे यांना यावेळी काळे झेंडेही दाखवण्यात आले आहेत. भोर तालुक्यातील नांद गावात काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे हेही यावेळी उपस्थित होते.
भोर तालुक्यात महाविकास आघाडीत बिघाडीएकीकडे कॉंग्रेस पक्षाचे नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांना राहूल गांधीच्या भारत जोडो यात्रेचे निमंत्रण देताना दिसून येत आहेत. भोर तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मात्र, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना काळे झेंडे दाखवताना दिसत आहेत.
भोर तालुक्यामध्ये काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेय वादावरून काळे झेंडे यांना दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी कितीही मजबूत आहे, असे म्हटले तरी स्थानिक स्तरावर मात्र हा संघर्ष वेगवेगळ्या घटनातून दिसून येत आहे.