पुणे - पुणे पोलिसांकडून अफजलखानच्या देखाव्याला परवानगी नाकारली होती. त्यानंतर प्रचंड अशी टीका झाली आणि त्यानंतर त्यांना परवानगी द्यावी लागली. त्यानंतर आता पोलिसांनी एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्ता संघर्षाच्या देखाव्याला पोलिसांकडून विरोध करण्यात आला आहे. पुण्यातील नरेंद्र मित्र मंडळाकडून या देखाव्याची परवानगी मागण्यात आली होती. पोलिसांनी नकार दिल्यामुळे मंडळाकडून नवीन देखावा तयार करण्यात येणार आहे. तर कोणत्याही प्रकारचा राजकीय रंग देण्याचा आमचा हेतू नव्हता असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले होते.
सुव्यवस्थेच्या कारणावरून पोलिसांनी ही परवानगी नाकारली पुण्यातील बुधवार पेठ येथे असलेल्या नरेंद्र मित्र मंडळाने या देखाव्यासाठी पोलिसांना परवानगी मागितली होती. राज्यात चाललेला सत्तासंघर्षावर हा देखावा होता. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्ष आणि राज्यातील सत्तांतर अशी या देखाव्याची पार्श्वभूमी होती. गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असताना पोलिसांकडून या देखाव्याची परवानगी नाकारली आहे. कुठल्याही प्रकारचा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न हा देखव्यातून होणार नव्हता, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पण शांतता आणि सुव्यवस्थेच्या कारणावरून पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे.
हेही वाचा - Ghulam Nabi Azad गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा, पाहा काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण