पुणे: पुण्याच्या उत्तम नगर पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या महिला आघाडीने शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या (Chandrakant Khaire) विरोधात तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्याबद्दल एकेरी भाषा वापरून अपमान कारक वक्तव्य केल्याबददल पुणे जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख पूजा रावेतकरांनी ही तक्रार पोलिसांत दाखल केली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना चंद्रकांत खैरेंनी मुख्यमंत्री शिंदेचा एकेरी उल्लेख करत शिंदेंना उलट टांगल पाहिजे असं वक्तव्य केल होतं. त्यावरून धमकीची भाषा वापरत बेजवाबदार व अपमानकारक वक्तव्य केल्याबद्दल खैरेंच्या विरोधात ही तक्रार दाखल केली आहे.
खैरे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावरही केली होती टीका - चंद्रकांत खैरे सध्या करत असलेल्या टीका या फक्त प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोप शिंदे गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी केला आहे. याआधी एकनाथ शिंदे यांच्या दारावर रात्री दोन वाजेपर्यंत जाऊन बसायचे, निधी आणून इकडे तो विकत होते. इतकेच नाही तर महाविकास आघाडी स्थापन झाल्यावर अनेक वेळा भाजपसोबत जायला हवं मात्र उद्धव साहेब ऐकत नाही, अशा तक्रारी त्यांनी खाजगी मध्ये केल्या होत्या, असा दावा जंजाळ यांनी केला आहे.