पुणे - पुणे तिथं काय उणे याची प्रचिती नेहमी विविध माध्यमातून येत असते. पुण्यातील येरवडा येथे राहणाऱ्या युसूफ शेख या 40 वर्षीय तिसरी पास व्यक्तीने चक्क स्कुटरवर एअर कॉम्प्रेसर ( Air Compressor on a Scooter ) बनवले आहे. या माध्यमातून स्वतःचे दुकान थाटत संसाराच गाडा ओढत आहेत.
येरवडा येथील फाय नाईन चौक येथे गेल्या 16 वर्षांपासून पंक्चरचे काम करतात. सुरुवातीला छोटेसे दुकान थाटून त्यांनी पंक्चरचे काम सुरू केले. मात्र, त्यानंतर जागा कमी पडू लागली. पायाने हवा भरण्याचा पंप त्यांच्याकडे होता. मात्र, त्यामुळे वेळ जास्त जाऊ लागला. याचा परिणाम ग्राहकांवर होऊ लागला. त्यानंतर त्यांना ही कल्पना सुचली. त्यानंतर एक जुने स्कुटर खरेदी करत त्यावर पक्रिया केली. मागील 3 वर्षांपासून ते या ठिकाणी पंक्चर काढण्याचे काम करत आहेत.
युसूफ शेख यांचे शिक्षण अवघे तिसरीपर्यंतचे झाले आहे. त्यांना ऑटोमोबाइल क्षेत्राचा काहीच अनुभव नव्हता. तरीही त्यांनी आपल्या कल्पना शक्तीच्या जोरावर त्यांनी स्कुटरमध्ये काही बदल करत त्याचे रुपांतर एअर कॉम्प्रेसरमध्ये केले आहे. त्यांनी त्यामध्ये त्यांनी तयार केलेल्या या स्कुटरमुळे त्यांचा उदरनिर्वाह चालतो. आजच्या काळात पेट्रोलच्या दराने शंभरी पार केल्यानंतर हे त्यांना कसे परवडते असे विचारल्यास ते म्हणाले, एका वाहनाच्या चाकांमध्ये हवा भरल्यानंतर 2 मिळतात, त्यातच मी समाधानी आहे.
हेही वाचा - Pune Crime News : पुण्यात गुंडांचा धुमाकूळ; वाहनांची केली तोडफोड