पुणे- मुसळधार पावसाने बुधवारी सायंकाळनंतर शहराला झोडपून काढले आहे. शहराच्या विविध भागात जोरदार पाऊस झाल्याने पाणी साचले आहे. तसेच काही ठिकाणी घरात पाणी शिरले आहे. जोरदार पावसामुळे कात्रज भागातील तसेच कर्वेनगर सुखसागर नगरसह अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.
शहरात संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू राहिला. मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. शहरातून जाणाऱ्या नाल्यांना पूर आला आहे. पर्वती, बिबवेवाडी, कात्रज, चंदननगर परिसरात अनेक ठिकाणी सोसायट्यांमध्ये व घरामध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.
श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिराभोवतलचा परिसरही पाण्याने वेढला आहे.
-
#WATCH: Heavy rainfall triggers waterlogging in parts of Pune; visuals from near Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Temple. #Maharashtra pic.twitter.com/1NyGodKDaB
— ANI (@ANI) October 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH: Heavy rainfall triggers waterlogging in parts of Pune; visuals from near Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Temple. #Maharashtra pic.twitter.com/1NyGodKDaB
— ANI (@ANI) October 14, 2020#WATCH: Heavy rainfall triggers waterlogging in parts of Pune; visuals from near Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Temple. #Maharashtra pic.twitter.com/1NyGodKDaB
— ANI (@ANI) October 14, 2020
चंदननगर येथील संपूर्ण पोलीस स्टेशन पाण्याखाली गेल्याने पोलीस कर्मचारी पाण्यात उभे राहून काम करत असल्याचे चित्र पहायला मिळाले. पुण्यात पडत असलेल्या या पावसामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहन पुण्याच्या महापौरांनी केले आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.