ETV Bharat / city

वाहतुकीच्या नियमभंगाचा दंड हॉटेलच्या खात्यावर जमा! पुण्यात धक्कादायक घटना - hotel on Kumthekar road

सातारा जिल्ह्यातील दोन तरुण पुण्यात दुचाकीवर कामानिमित्त आले होते. टिळक चौकात दुपारी आल्यानंतर त्यांनी 'नो-पार्किंग'मध्ये दुचाकी लावल्या होत्या. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या वाहतूक पोलिसांनी दुचाकींना जॅमर लावले.

Pune Police
पुणे पोलीस
author img

By

Published : Mar 6, 2021, 7:16 PM IST

पुणे- सातारा जिल्ह्यातील दोन तरुणांना नो-पार्किंग'मध्ये दुचाकी लावल्याचा चार हजारांचा दंड पोलिसांनी ठोठावला. शेवटी तडजोडीने एक हजार रुपये पुण्यातील नारायण पेठेतील कुमठेकर रस्त्यावरील हॉटेलच्या खात्यावर वाहनचालकांना भरायला लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

सातारा जिल्ह्यातील दोन तरुण पुण्यात दुचाकीवर कामानिमित्त आले होते. टिळक चौकात दुपारी आल्यानंतर त्यांनी 'नो-पार्किंग'मध्ये दुचाकी लावल्या होत्या. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या वाहतूक पोलिसांनी दुचाकींना जॅमर लावले. त्या दोन तरुणांना दोन्ही गाड्यांचा तीन हजार रुपये दंड भरावा लागेल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे दोन तरुणांनी त्याची माहिती तत्काळ पुण्यातील एका नातेवाइकांना दिली. ते तत्काळ त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी दंडाबाबात चौकशी केली. त्या वेळी 'नो पार्किंग'चा दोन हजार व फॅन्सी नंबर प्लेट आणि इतर असा दंड तीन हजार रुपये असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

हेही वाचा-मुथुट फायनान्सचे चेअरमन एमजी जॉर्ज यांचे निधन

नातेवाईकांनी तडजोड करण्यास सांगितल्यावर ते पैसे तुम्ही एका हॉटेलमध्ये द्या, असे त्यांना सांगितले. त्यासाठी टोइंग व्हेइकलवर असलेला एक तरुण त्यांना कुमठेकर रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी 'फोन पे'वरून त्यांनी पोलिसांनी सांगितलेल्या हॉटेलमध्ये पैसे भरले. हा सर्व प्रकार गंभीर असून, याकडे वरिष्ठ लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा-तापसी पन्नूसह अनुराग कश्यप यांच्या घरावर २०१३ मध्येही आयटीने मारले होते छापे

पैसे भरल्याची पावतीही दिली नाही

वाहतूक पोलिसांकडून जे पैसे हॉटेलमध्ये भरायला सांगितले गेले त्या पैश्यांची पावतीदेखील त्या तरुणांना दिली गेली नाही. यामुळे हा दंडाचा कोणता नवीन प्रकार आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. या प्रकरणत वरिष्ठ पोलीस लक्ष देतील का आणि संबंधित पोलिसांवर कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.