पुणे - शिवसेनेचे बंडखो एकनाथ शिंदे ( Shivsena Rebel Leader Eknath Shinde ) यांना पाठिंबा देत छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील ( Nanasaheb Jawale Patil ) यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले की, राज्यात सध्या संजय राऊत हे दादागिरीची भाषा करत आहेत. त्यांनी बोलताना तारतम्य ठेवावं अन्यथा आमचे छावे तुम्हाला राज्यभर फिरू देणार नाही.
छावाचा पाठिंबा जाहीर झाल्याने आता बंडखोर आमदारांच्या पाठिशी हिंदुत्ववादी संघटना उभ्या राहत असल्याचं चित्र दिसत आहे. तसेच उद्या हे आमदार मुंबईत आले तर आम्ही या आमदारांना संरक्षण देऊ. कोणीही आडकाठी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल, असं देखील यावेळी जावळे पाटील म्हणाले.