पुणे - केंद्र सरकारकडून राज्याला मिळणारा निधी मिळाला नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना दिली ( Ajit Pawar On Center Government ) होती. त्याला आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काहीही दिलं तरी राज्य सरकावर प्रत्येक वेळी केंद्र सरकारवर बोट दाखवत आहे. तुम्ही काय फक्त खुर्च्या गरम करायला सत्तेत बसला आहात का, असा सवाल करत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली ( Chandrakant Patil On Mahavikas government ) आहे.
पुण्यात माध्यमांना बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "राज्याला केंद्र सरकारने काहीही दिलं तरी तुम्ही प्रत्येकवेळी केंद्राकडे बोट दाखवता. केंद्र सरकारने दरवेळेस राज्याला मदत दिली. मात्र, राज्य सरकार काय करत आहे हेच समजत नाही. तुम्ही काय फक्त खुर्च्या गरम करायला सत्तेत बसला आहात का," असा सवाल त्यांनी विचारला आहे.
'मुख्यमंत्री बाहेर पडले यात आनंदच'
"आज मुख्यमंत्री खूप दिवसांनी बाहेर पडले. आम्ही त्यांच्या तब्येतीसाठी वेळोवेळी प्रार्थना करत होतो. आमची इतकीच इच्छा होती की जर मुख्यमंत्र्यांना प्रवास सहन होत नाही तर त्यांनी त्यांचा चार्ज दुसऱ्यांना द्यावा. कारण राज्य कारभार चालला पाहिजे," असेही पाटील यांनी ( Chandrakant Patil On Cm Uddhav Thackeray ) म्हटलं.
'ओबीसी आरक्षणाचा सरकार फक्त दिखावा'
"राज्य सरकार जर निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असेल तर तस करता येत नाही. ओबीसी आरक्षणाचा सरकार फक्त दिखावा करत आहे. मुळात आरक्षणाच्या धोरणावरून सरकारला कुठलीही निवडणूक पुढे ढकलता येणार नाही अशी तरतूद कायद्यात आहे," असेही चंद्रकांत पाटील यांनी ( Chandrakant Patil On Obc Reservation ) सांगितले.
हेही वाचा - Nashik Crime News : नाशिक मध्ये महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला