ETV Bharat / city

Chandrakant Patil : 'परखडपणाने समाज चालत नाही', चंद्रकांत पाटलांची अजित पवार यांच्यावर टीका

यंदाचं हिवाळी अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरऐवजी मुंबईत होत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये सुरू असलेल्या सुंदोपसुंदीवरून अधिवेशनात दोन्ही बाजूंनी खडाजंगी पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण कोणतेही सरकार करू शकत नाही, असे स्पष्टपणे सांगितले. त्यावर आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर ( Chandrakant Patil criticized Ajit Pawar ) टीका केली.

author img

By

Published : Dec 25, 2021, 11:47 AM IST

Updated : Dec 25, 2021, 1:29 PM IST

चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil

पुणे - माझ्या एसटी कर्मचाऱ्यांनो सरकारमध्ये विलीनीकरण होईल, हा मुद्दा डोक्यातून काढून टाका. सर्वच महामंडळांच्या कर्मचाऱ्यांनी असा हट्ट धरला, तर तो पूर्ण करणे कोणत्याही सरकारला शक्य होणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar On ST Strike ) यांनी विधानसभेत स्पष्ट केल्यानंतर आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ( Chandrakant Patil criticized Ajit Pawar ) आपलं मत व्यक्त केलं आहे. अजित दादांना नेहेमीच असं वाटतं की त्यांच्या परखडपणा किती मोठा आहे. अशा परखडपणाने समाज चालत नाही. तीच गोष्ट नीट सांगायची असते. तुम्हाला जर असं वाटतंय की विलीनीकरण शक्य नाही तर का नाही. तुम्ही जर जीवन प्राधिकरणाच विलीनीकरण करू शकता, तर मग एसटीच का नाही? तुम्हाला अडचण काय आहे. राज्याची तिजोरी आहे कशासाठी, असा सवाल देखील यावेळी पाटील यांनी केला.

चंद्रकांत पाटीलांची अजित पवार यांच्यावर टीका
आज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आणि त्यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्यावतीने अटलशक्ती महासंपर्क अभियान सुरू करण्यात आलं आहे. हर घर मोदी या नावाने दीड लाख घरापर्यंत जाण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याची सुरवात आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथील सुभाष काळे यांच्या घरापासून केली. फडणवीस योग्य वेळेला कोर्टात जातील -सर्वसामान्य नागरिकांना न्यायव्यवस्थेत वेगवेगळ्या कारणाने तारखा मागू शकता. तसे फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस हे योग्य वेळेला कोर्टासमोर जातील आणि सांगतील की या प्रकरणात माझं काहीही संबंध नाही. या प्रकरणाचा मी जवळून अभ्यास केला आहे, असं देखील पाटील यावेळी म्हणाले.टीईटीची परीक्षा रद्द करा -हे सरकार गेंड्याच्या कातळीपेक्षा जास्त असंवेदनशील आहे. प्राण्यांपेक्षा भयानक असंवेदनशील सरकार झालं आहे. आरोग्यभरती म्हाडा आणि टीईटी परीक्षेत गोंधळ झाला आहे. मुळात या सरकार ला लोकांनी निवडून दिलेलं नाही. इकडून तिकडून गोळा बेरीज करून हे सरकार सत्तेवर आलं आहे. या टीईटीचे धागेदोरे हे पोलीस भरतीपर्यंत गेले आणि ते आत्ता मंत्रालयापर्यंत गेले आहे. त्यामुळं टीईटीची परीक्षा रद्द झाली पाहिजे आणि ती नव्याने घेतली पाहिजे, असं देखील पाटील यावेळी म्हणाले.हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : 'या' क्रांतिकारकाच्या पिस्तूलचे नाव होते 'बमतुल बुखारा', वाचा सविस्तर...

Last Updated : Dec 25, 2021, 1:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.