ETV Bharat / city

'अजित पवार म्हणजे सौ चूहे खा के बिल्ली चली हज को'

author img

By

Published : May 22, 2021, 6:02 PM IST

Updated : May 22, 2021, 10:28 PM IST

अजित पवार म्हणजे सौ चूहे खा के बिल्ली चली हज को, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली. पुण्यातल्या बाणेर येथे भाजपाकडून उभारण्यातआलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन प्रसंगी पाटील बोलत होते.

Chandrakant Patil criticized Ajit Pawar in Pune
अजित पवार म्हणजे सौ चुहे खा कर बिल्ली चली हज को - चंद्रकांत पाटील

पुणे - अजित पवार यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. ते म्हणाले अजित पवार म्हणजे सौ चूहे खा के बिल्ली चली हज को, अशी स्थिती आहे. महाराष्ट्रात सध्या सगळ्या विषयातल सगळे कळणारे आणि ज्यांना सगळ्या विषयावर मार्गदर्शन करायचे असते अशांमध्ये खासदार संजय राऊत यांच्या नंतर अजित पवारांचा नंबर लागतो, अशी बोचरी टीका पाटील यांनी केली.

'मुख्यमंत्र्यांना ही कोकणात जाऊन राहण्याचा सल्ला द्यावा' -

अजित पवारांनी निधी देण्यावरून मोदींवर टीका केली होती, त्यावर पाटील बोलत होते. मोदींवर बोलणाऱ्या अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांनाही कोकणात जाऊन राहण्याचा सल्ला घ्यावा आणि स्वतःही त्या ठिकाणी जाऊन नुकसान ग्रस्तांसाठी काम करावे अशी टीका पाटील यांनी केली. पुण्यातल्या बाणेर येथे भाजपाकडून उभारण्यातआलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांनी केले, यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा - सहा महिन्यांनंतरही १२ आमदारांची नियुक्ती का नाही? हायकोर्टाचा राज्यपालांना सवाल

त्यांनीमोदींच्या भावुक होण्याची चेष्टा करणाऱ्यांवर पाटीलांची टीका -

उद्धव ठाकरेंनी 2 दिवसात पंचनामे करून मदत जाहीर करण्याचे सांगितले. मात्र, 2 दिवसात पंचनामे होण्यासाठी त्यांनी 3 दिवस जायला हवे होते अशी बोचरी टीका केली. शरद पवार आमचे राजकीयदृष्ट्या कितीही विरोधक असले तरी लातूर भूकंपाच्या वेळी शरद पवारांनी लातूरला आपले हेडकोर्टर केले होते आणि परिस्थिती आटोक्यात आणली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी ही कोकणात राहावे, तुमच्या तब्येतीला प्रॉब्लेम असेल तर तंबूत नका राहू पण हॉटेलमध्ये रहा पण तिथे रहा असे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी मोदींच्या भावुक होण्याची चेष्टा करणाऱ्यांवर पाटील यांनी टीका केली. राजकारणाची पातळी इतकी खाली गेलीय, या देशात काही परंपरा आहेत, कोणाबद्दल काय बोलावे, तुम्ही जर अशाप्रकारे एखाद्या माणसाच्या भावनांची थट्टा करत असाल तर मोदींना काही फरक पडत नाही, मोदी काम करत राहतात टिकेकडे लक्ष देत नाही. मात्र, राजकारणाची पातळी इतकी खाली गेलीय की एखाद्या माणसाला मनापासून दुःख झाले तर त्याची चेष्टा करायची, असे सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोदीच्या भावुक होण्याची चेष्टा करणाऱ्याचा समाचार घेतला.

हेही वाचा - 'ब्लॅक फंगसचा सामना करण्यासाठी टाळ्या-थाळ्या वाजवण्याची घोषणा पंतप्रधान लवकरच करतील'

Last Updated : May 22, 2021, 10:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.