ETV Bharat / city

चंद्रकांत पाटील म्हणतात, नरेंद्र मोदींमुळे अब्दुल कलामांना राष्ट्रपती पदाची संधी - Chandrakant Patil over Abul Kalam

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने तरुणाईला जोडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या 'युवा वॉरियर्स' अभियानाची सुरुवात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाली.

चंद्रकांत पाटील व इतर
चंद्रकांत पाटील व इतर
author img

By

Published : Feb 19, 2021, 7:13 PM IST

Updated : Feb 19, 2021, 7:22 PM IST

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांना प्राधान्य दिले. मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले होते, असा अजब दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. अब्दुल कलाम यांना मुसलमान म्हणून नव्हे तर कर्तृत्ववान, संशोधक म्हणून संधी दिली होती, असेही त्यांनी म्हटले. ते भाजप युवा मोर्चातर्फे आयोजित 'युवा वॉरियर्स या कार्यक्रमात बोलत होते.

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने तरुणाईला जोडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या 'युवा वॉरियर्स' अभियानाची सुरुवात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाली. यावेळी त्यांनी तरुण पिढीला खरा इतिहास सांगण्याची गरज असल्याचे म्हटले. राष्ट्राशी, इतिहासाशी आणि संस्कृतीशी जोडण्याचे काम युवा मोर्चा करत असल्याचे कौतुक केले.

या देशातील सर्व मुस्लिम राष्ट्रदोही नाहीत
माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, बाराशेपर्यंत यादवांचे अतिशय चांगले राज्य होते. परकीय आक्रमकांविरुद्ध शिवाजी महाराज लढले. त्यांच्यातील जे चांगले मुसलमान होते ते महाराजांच्या सैन्यात होते. आजही या देशाबद्दल व्यक्त करणाऱ्या मुसलमानांना आपण आपले म्हणतोच. या देशातील सर्व मुस्लिम राष्ट्रदोही नाहीत. पण काश्मीरमध्ये हल्ले करणारा आणि वेगवेगळ्या आंदोलनात स्लीपर सेल म्हणून काम करणारा मुस्लिम राष्ट्रदोही आहे. या सर्व स्लीपर सेलमध्ये काम करणाऱ्या मुसलमानाला विरोध करायचा नाही का? असा त्यांनी सवाल केला. सर्वसाधारण मुसलमानाला विरोध नाही, असे मत यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

नरेंद्र मोदींमुळे अब्दुल कलामांना राष्ट्रपती पदाची संधी
योग्य दिशा देऊन राष्ट्रहितासाठी ही शक्ती कार्यान्वित करायला हवी-छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर व अटलबिहारी वाजपेयी आदी महापुरुषांचे कर्तृत्व या युवापिढीला समजून घेण्याची गरज आहे. आज समाजात आजूबाजूला अनेक अडचणी आहेत. ते सोडविण्यासाठी आपण काय योगदान देऊ शकतो, याचा विचार तरुणांनी केला पाहिजे. १८ ते २५ या वयोगटातील तरुणाईचे सळसळते रक्त असते. त्याला योग्य दिशा देऊन राष्ट्रहितासाठी ही शक्ती कार्यान्वित करायला हवी. स्वातंत्र्य लढ्यात तरुणांचे मोठे योगदान होते. तसेच योगदान आजही या तरुणाईने द्यायला हवे.

हिंदुत्व या युवाशक्तीमध्ये बिंबवण्याचा काम होण्याची आवश्यकता

राज्यभर सर्व राजकीय, सामाजिक कार्यक्रम मोठ्या स्वरूपात होत असताना शिवजयंतीला परवानगी नाकारणे हे दुर्दैव आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे काळजी घेऊन शिवजयंती साजरी करण्याची परवानगी द्यायला हवी होती. पक्षाचे अध्यक्ष गावोगाव जाऊन कार्यक्रम व मेळावे घेतात. त्यावर निर्बंध नाहीत. मात्र, शिवजयंतीला निर्बंध घातले जातात. अभिव्यक्त होणाऱ्या लोकांवर बंदी घालण्याची भाषा निंदनीय आहे. एल्गार परिषद होते. मात्र, पोवाडे चालत नाहीत. हिंदू धर्म हा सहनशील आणि सहिष्णू असल्याने सर्वधर्मसमभावाचे धडे देण्याचे केविलवाणे प्रयत्न अनेकजण करतात. त्यामुळे जाज्वल्य हिंदुत्व या युवाशक्तीमध्ये बिंबवण्याचा काम होण्याची आवश्यकता असल्याचेही पाटील यावेळी म्हणाले.

त्यावेळेस होते अटलबिहारी वाजपेयी सरकार-

प्रत्यक्षात २००२ मध्ये वाजपेयी सरकार असताना सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्र येत डॉ. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलs. त्यावेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे तर अटलबिहारी वाजपेयी होते.

कोंढवे-धावडे येथील दामिनी लॉन्समध्ये झालेल्या सोहळ्याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर, भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, 'भाजयुमो'चे प्रदेश उपाध्यक्ष व युवा वॉरिअर्स राज्य संयोजक अनुप मोरे, सरचिटणीस सुशीलभाऊ मेंगडे, भाजयुमो पुणे शहराध्यक्ष राघवेंद्र उर्फ बापू मानकर, आदी उपस्थित होते.

Last Updated : Feb 19, 2021, 7:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.