पुणे - पुण्यातील लक्ष्मी रोडवरील व्यापारी चंदन सेवानी यांचे अपहरण करून दोन कोटींची खंडणी मागितली होती. ही खंडणी देण्यास नकार दिल्याने सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे नेऊन गोळी झाडून त्यांचा खून करण्यात आला होता. या गुन्ह्याप्रकरणी अटकेत असलेल्या सातही आरोपीवर संघटित गुन्हेगारी (मोक्का) कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलीय.
पोलिसांनी याप्रकरणी टोळीचा मोरक्या परवेज शेखसह आफ्रिदी खान, सुनील गायकवाड, अजिंक्य धुमाळ, किरण कदम, प्रीतम अंबरे, परवेज शेख, अनिल काळ यांना अटक केली होती. आरोपींकडून सात देशी बनावटीचे पिस्टल 58 जिवंत काडतुसे, पाच अतिरिक्त मॅगझीन, आठ फोन, वॅगन कार आणि एक्टिवा कार जप्त केली होती. परवेज शेख यानं हडपसर पुणे सातारा सांगली जिल्ह्यात आर्थिक फायद्यासाठी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले होते. परवेज शेख यानं हडपसर पुणे सातारा सांगली जिल्ह्यात आर्थिक फायद्यासाठी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. शेख हा टोळीचा मुख्य असून वेगवेगळ्या साथीदारांचा गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. परवेज शेखनं आरोपींची टोळी बनवून आर्थिक फायद्यासाठी आणि वर्चस्वासाठी गुन्हे केल्याचे निष्पन्न झालं.