ETV Bharat / city

आजपासून पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज - राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही भागात 16 ते 19 ऑगस्टदरम्यान मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

meteorological department
meteorological department
author img

By

Published : Aug 16, 2021, 3:59 PM IST

पुणे - मागील काही दिवसांपासून दांडी मारलेला पाऊस आजपासून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही भागात 16 ते 19 ऑगस्टदरम्यान मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाच्या पुणे येथील कार्यालयाने ही माहिती दिली आहे.

pune meteorological department
परिपत्रक

बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता -

16 ते 19 ऑगस्ट या कालावधीत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये तर वीजेच्या कडाटासह जोरदार पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

17 ऑगस्ट रोजी बहुतांश जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' -

पुणे हवामान विभागाकडून 17 ऑगस्ट रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' दिला आहे. या दिवशी कोकण गोवा विभागात बहुतांश ठिकाणी पाऊस तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीनंतर पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. परंतु आता मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिल्यानंतर शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा - भाजपच्या ठाण्यातील जनआशीर्वाद यात्रेला आनंदनगरमधून सुरूवात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.